सिडको :पॉर्न फिल्म पाहून पत्नी सोबत नको ते, हायकोर्टात पॉर्न साईट बंद करायची मागणी

सिडको परिसरातील प्रकार, अनेक दिवसांपासून अत्याचार होते सुरुdont watch bad films family court ban films supreme court

सिडको येथे संतापजनक घटना घडली आहे. सिह्स्थ नगर येथील एका विवाहितेने नवरया विरोधात प्रणय करताना शारिरीक छळ करत असल्याची तक्रार अंबड पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. यामध्ये नवरा काम धंदा सोडून पत्नीला अश्लिल पॉर्न  फिल्म फिल्म दाखवून त्यातील अनिसार्गिक कृत्य करत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसात धाव घेतली आहे.dont watch bad films family court ban films supreme court

अंबड येथील दाखल तक्रारी नुसार पती हा २५ /१२/२०१५ ते २१/०९/२०१६ या कालावधीत  या पतीने महिलेस छळले आहे. यामध्ये पती हा मोबाईलवर क्लिप सुरु करत असे, त्यांच्या निवांत क्षणी तो या क्लिप मधील कृती अर्थात प्रणयाचे अनैसर्गिक प्रकार करत असे, तिने तसे केले नाही तर तिला मारहाण करण्यात येत होती. काही दिवस सुरु असलेला हा त्रास आता उग्र रुप घेऊ लागला होता. हा पती तिच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करू लागला, शेवटी या गोष्टीला कंटाळून तिने पोलिसात धाव घेतली आहे. (यातील पतीचे नाव देणे आम्ही टाळले आहे. कारण यामुळे महिलेची बदनामी होण्याची शक्यता आहे.) पोलिसांनी भादविक ३७७, ४०६ नुसार आणि महिलांचे घरघुती हिंसाचारापासून संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आणा,  विवाहितेची सुप्रीम कोर्टात मागणी
भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईतील 27 वर्षीय विवाहितेने सुप्रीम कोर्टात केली आहे. ‘माझ्या 35 वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो. त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. सुप्रीम कोर्टाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी.’ असं तरुणीने सुप्रीम कोर्टाला सांगितलं.
पती फँटसीमध्ये रममाण झालेला असतो. त्याचं ना संसाराकडे लक्ष आहे, ना माझ्या शारीरिक गरजांकडे. उत्साह नसल्यामुळे दैनंदिन कामंही तो व्यवस्थित करत नाही. आपल्या इच्छेविरोधात अनैसर्गिक ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा दावाही तिने केला आहे. पॉर्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे भारतात सेक्सविषयक गुन्हे आणि वैवाहिक वादांमध्ये वाढ झाल्याचंही तिने सांगितले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.