Dont USE AC घरी राहा, सुरक्षित राहा; एसीचा वापर टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Dont USE ACरोखण्यासाठी एसी बंद ठेवा असे आवाहन करताना यानिमित्ताने मोकळ्या हवेत, वातावरणात राहण्याची संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
जीवनावश्यक वस्तू, सेवा, दुकाने, उत्पादनांची वाहतूक सुरुकाल नागरिकांमध्ये थोडी अस्वस्थता होती, त्यांची धावपळ झाली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन आपल्याकडे आधी पासूनच सुरु आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो की, आपल्याकडे पुरेसा अन्नधान्य साठा आहे. आपण जीवनावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, ती दुकाने, दवाखाने, पशुखाद्य, माणसांचे दवाखाने, दुध, भाजीपाला, फळे, कृषी मालाची वाहतूक औषधांची दुकाने बंद केलेली नाहीत. या जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, गर्दी करू नये.Dont USE AC

वेतन रोखू नये-कंपन्यांना आवाहन

हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आता सर्वांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले आहे. हे जागतिक युद्ध आहे. हा छुपा शत्रू आहे, नकळत हल्ला करतो. याचे आव्हानही खूप मोठे आहे, ते गांभीर्यानेच घ्यायला हवे. जी रोजंदारीवर काम करणारी कष्टकरी माणसं आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे अशा कर्मचारी-कामगारांचे  वेतन  कंपन्यांनी, कारखान्यांनी बंद करू नये, ते सुरु ठेवून मानव धर्म पाळावा असेही ते म्हणाले.Dont USE AC

हे युद्ध आपण जिंकणारच

मदतीसाठी पुढे येणाऱ्या अनेक हातांचे त्यांनी कौतुक केले. रिलायन्स इंडस्ट्रीने एक हॉस्पिटल तयार करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. कुणी मास्क उपलब्ध करून देत आहे तर कुणी आणखी काही. या सगळ्यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला हे युद्ध जिंकायचेच आहे, नव्हे आपण ते जिंकणारच असा विश्वासही त्यांनी  यानिमित्ताने व्यक्त केला.Dont USE AC

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.