वॉक वीथ कमिशनर, नाशिककर खुश, शहराचा विकास प्रथम, प्रसिद्धीसाठी मी इथे नाही – तुकाराम मुंढे

करवाढीचे केले समर्थन, अनेक तक्रारी सोडविल्या

नाशिक : गेल्या आठवड्यात रद्द झालेला नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा’वॉक वीथ कमिशनर’उपक्रम शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर पार पडला. यावेळी आयुक्तांनी सुमारे  शंभराहून अधिक तक्रारी ऐकत अनेक तक्रारी लगेच सोडवल्या तर काहीना सूचना देत आठवड्याची मुदत दिली. याशिवाय वैयक्तिक तक्रारी आणि अनावश्‍यक तक्रारदारांना कडक शब्दात खडसावले. महापालिकेकडून करण्यात आलेल्या करवाढीवर बोलतांना स्मार्ट सिटी, सुविधा हव्या तर करवाढ अपरिहार्य आहे. त्याचा दुरुपयोग होऊ देणार नाही. मी विकासाला बांधिल आहे. मी पॉप्युलर होण्यासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी आलो असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले.

गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तक्रारदार नागरिकांना टोकन क्रमांकाचे वाटप झाल्यानंतर आयुक्तांनी मैदानावर उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठावरून एकेक तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली.

मागील आठवड्यात शनिवारी मुंढे यांच्या मातोश्री यांची तब्येत बिघडली असल्याने हा उपक्रम होवू शकला नव्हता, तर दुसरीकडे विभागीय आयुक्त यांना सुट्टीचा अर्ज मुंढे यांनी दिला होता. त्यामुळे अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या, मात्र आज उपक्रम सुरु झाला आणि सर्व चर्चांना  विराम बसला आहे. तर त्याबरोबर तुकाराम मुंढे हे दीर्घ रजेवर जाणारा नसून रजा रद्द करण्यात आली आहे.

 ‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ 

आज आयुक्त तुकाराम मुंढेंनी शंभराहून अधिक तक्रारी ऐकत  त्यावर लगेच निर्णय दिले आहे. तर अनेक तक्रारी लगेच सोडवल्या. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधींतांना  सुचना केल्या आहेत.  सोबत त्यांनी त्यांच्या शैलीनुसार वैयक्तिक तक्रारी करणारे, अनावश्‍यक कोणतही मागणी करणरे यांना त्यांनी चांगलेच झापले आहे. नेहमी प्रमाणे नेते गिरी करत आलेल्या सत्कार करू इच्छित असलेल्या एका नेत्याला त्यांनी सर्वांसमोरच खडसावले आहे.

महापालिकेच्या अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या या उपक्रमाला नागरीकांचा मोठा  प्रतिसाद मिळाला. गेल्या शनिवारी दिलेल्या 106 तक्रारी त्यांनी ऐकल्या. अडीच तास न थकता त्यांनी सगळ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीही करुन दिली.

आमच्या सोबत जाहिरात करा लाखो नागरिकांन पर्यंत पोहोचा !

कर वाढ शहराच्या विकासासाठी :

शहराचा विकास अर्थात वाढती लोकसंख्या आणि सुविधांवर पडणारा ताण दूर करणे गरजेचे आहे. याबरोबर नागरिकांना रस्ते, पाणी, पथदीप, मैदानांचा विकास, रस्ते निर्माण करणे गरजेचे आहे.याबरोबर प्रत्येक नागरिकास  स्मार्ट सिटी हवी आहे. मात्र त्यासाठी ज्या सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यासाठी पैसे लागणार असून, त्या करिता तो पैसा उभा करतांना तुमच्याकडूनच कर स्वरुपात घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरात  मी करवाढ केली आहे. त्याला काही लोक विरोध करत आहेत. मात्र तुम्ही जर पाहिले तर  ब दर्जाच्या पिंपरी चिंचवडला सातशे कोटी, नवी मुंबईला चारशे कोटींचे करसंकलन होते. त्या तुलनेत नाशिकला केवळ 82 कोटींचा कर आहे. कराचा दर देखील कमी आहे. तरीही काही लोक त्याला विरोध करत आहेत. त्याबाबत मी काही बोलणार नाही. स्मार्ट सिटी, सुविधा हव्या तर करवाढ अपरिहार्य आहे. त्या पैश्यांचा दुरुपयोग मी होऊ देणार नाही. मी विकासाला बांधिल आहे. मी पॉप्युलर होण्यासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी आलो आहे. असे तुकाराम मुंढे यांनी सर्वांसमोर स्पष्ट केले.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध कार्याची आहे, सोबत  काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.