डॉक्टर नाही देवदूत : रस्त्यात उपचार करत वाचविले प्राण

नाशिक : एरवी एखादा अपघात झाला तर नेहमी बघ्यांची गर्दी होते. आणि आता तर आगोदर मोबाईलवर फोटो काढण्याची चढाओढ होते. त्यामुळे  गर्दी झाल्यानंतर मदत कार्य करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघात गंभीर असल्यास अपघात ग्रस्त व्यक्ती मृत होते. मात्र  नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम इथं रात्री अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीवर थेट रस्त्यातच उपचार करण्यात आले आहेत. पंचवटीच्या अमृतधाम चौफुलीवर रात्री साडे नऊच्या सुमारास दोन मोटार सायकलचा अपघात झाला होता.  या अपघातात एकाच्या तोंडला आणि डोक्याला जबर मार लागला होता.

 अपघात झाला त्याच वेळी कळवणचे डॉ. सुहास कोटक हे रस्त्याने आकार ने जात होते तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार दिसला होता. त्याचवेळी त्यांनी गाडी थांबवत त्वरित जखमींवर उपचार सुरू केले  होते.  आंबूलन्सला फोन केला मात्र जवळपास ३० मिनिटापेक्षा अधिक वेळ झाला होता. अपघातात जखमींच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता आणि ते रक्त फुफुसात जात होते. त्यामुळे त्याला ऑक्सिजनची गरज होती. त्याचवेळी  डॉ. सुहास कोटक यांनी आपल्या गाडीत असलेला ऑक्सिजन पंप काढत जखमींवर  त्याच ठिकाणी  रस्त्यावरच सुरू उपचार केले होते. दरम्यान सुहास कोटक यांनी दाखवलेल्या तत्पर सेवेमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे प्राण वाचले आहेत. डॉ. कोटक यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

डॉ. सुहास कोटक

विशेष म्हणजे या ठीकाणी आडगाव पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना फोन करूनही कोणताही कर्मचारी या ठिकाणी आला नाही. मात्र याच वेळी पंचवटी पोलीस स्टेशच चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे हे घटनास्थळी पोहोचले होते. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी गोंधळ न करता एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितलय होते.डॉ. सुहास कोटक यांची प्रतिक्रिया :

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.