Doctor beaten upडॉक्टरला जबर मारहाण, रुग्णालयाची तोडफोड, तिघांना अटक video

नाशिकमध्ये कोरोनासदृश्य रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. शहरातील अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात सदर रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. Doctor beaten up

अंबड येथे डॉक्टर ला बेदम मारहाण बिलावरून वाद । बातमी लवकरच ।

تم النشر بواسطة ‏‎Nashik On Web‎‏ في الثلاثاء، ٤ أغسطس ٢٠٢٠
व्हिडियोसाठी क्लिक करा सोबतच आमचं पेज नक्की लाईक करा

या घटनेमध्ये एका खासगी रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एक रुग्ण उपचारासाठी दाखल होता. उपचार सुरू असताना सोमवारी तो दगावला. संबंधित रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालयाला डिपॉझिट केलेले पैसेदेखील डॉक्टरांकडून परत मिळाले नाहीत. यावरून रुग्णालय प्रशासन व मृत रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये सुरवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर डॉक्टरांशी चर्चेदरम्यान वादाचे वाढत जाऊन हाणामारीत व तोडफोडीत झाली.

दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याच्या आरोपावरून मृताच्या संतापलेल्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरास मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटनास्थळी चर्चा होती. दुसरीकडे रुग्णालयात नातेवाईक डॉक्टरला मारहाण करतानाची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्या आधारे नाशिक शहर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.Doctor beaten up

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.