शेतक-यांवरील अन्याय सहन करणार नाही- धनंजय मुंडे

नाशिक : शेतक-यांवर त्यांच्यावर कलम ३०७,३९५ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाला शेतक-यांवर ३०७ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा अधिकार कोणी दिला असे सांगत शेतक-यांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. ते आज येवला तालुक्यातील आंदोलक शेतक-यांवर झालेल्‍या गुन्‍ह्यांसदर्भात व आत्‍महत्‍या ग्रस्‍त शेतक-यांचे सात्‍वंन करण्‍यासाठी आले आसता आयोजित भेटी प्रसंगी बोलत होते.

यावेळी धनंजय मुड़े पुढे म्हणाले की, येवला तालुक्यातील शेतक-यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येवला तालुक्याच्या दौऱ्यावर आलो असून भुजबळ साहेब आज बाहेर असते तर शेतक-यांवर ही वेळ नक्कीच आली नसती असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात सततचा दुष्काळामुळे व सततच्‍या नापीकीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्‍यात शेतमालाला भाव नसल्‍यामुळे  शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला असुन दि. 1 जुन पासुन आपल्या रास्त मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आहे. एकीकडे दुष्काळाने मारले तर दुसरीकडे सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणांमुळेइतिहासात शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला आहे. शांततेच्‍या मार्गाने शेतकरी आंदोलन करत असतांना पोलिसांकडुन शेतक-यांवर  अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. तसेच त्‍यांच्‍यावर गंभिर स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले. हा शेतक-यांवरील अन्‍याय कदापी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सहन करणार नसुन शेतक-यांच्‍या नादाला लागला तर शेतकरी सरकार घालवल्‍याशिवाय राहणार नाही अशी टीका त्‍यांनी केली.

—————————————————————————————————————————————

नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.