विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची निवड

नाशिक विभागीय शालेय १४, १७, १९ वर्षाखालील कॅरम स्पर्धेसाठी पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या ७ विद्यार्थिनींची निवड झाली आहे. सदर स्पर्धा १८ ते १९ सप्टें. दरम्यान भुजबळ मेट नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, क्रीडा परिषद नाशिक, भुजबळ मेट नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व नाशिक जिल्हा कॅरम असोशिएशन च्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

दि. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान नाशिक म.न.पा. जिल्हास्तरीय शालेय १४, १७, १९ वर्षाखालील कॅरम स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, क्रीडा परिषद नाशिक, भुजबळ मेट नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भुजबळ मेट नॉलेज सिटीच्या जिमन्याशिअम मध्ये करण्यात आले होते. स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खालील विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

१४ वर्षाआतील – उमावती सोनावणे, साक्षी साखरे, वैष्णवी लहामगे,

१७ वर्षाआतील – गौरी सोनावणे,

१९ वर्षाआतील – नेहा वाळुंज, राणी खेमनार, कृतिका कन्नर

यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, कोषाध्यक्षा वैशाली गोसावी, शालेय समितीचे अध्यक्ष संजय परांजपे, मुख्याध्यापिका जोत्सना आव्हाड, पर्यवेक्षिका श्रीमती स्मिता पाठक, जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी यांनी अभिनंदन केले. सदर खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा महाराष्ट्र राज्य कॅरम असोशिएशन चे उपाध्यक्ष आनंद खरे, क्रीडा शिक्षिका श्रीमती सुचेता कुकडे, क्रीडा शिक्षक खंडू चौधरी, प्रशांत भाबड, सुरेश शिंदे, यांचे मार्गदर्शन लाभले.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.