सासूरवाडीला गेलेल्या जावयाने केला सासूवर बलात्कार 

Share this with your friends and family

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधील शास्त्रीनगर येथे सासूरवाडीला गेलेल्या जावयाने सासूवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.disturbing soninlaw rapes motherinlaw nashik nandgoan 

याप्रकरणात महिलेची मुलगी आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी पीडित महिला बोयेगाव येथे गेली. दिवसभर मुलीकडे थांबून पीडित महिला संध्याकाळी घरी परतण्यासाठी निघाली. त्यावेळी जावयाने घरी सोडतो असे सांगितले. दुचाकीवरून जावयाने संध्याकाळी सासूला जोंधळेवाडी फाट्याजवळ सोडले. घरी आल्यावर पीडित महिला तिच्या वृद्ध वडिलांना जेवण देऊन झोपण्यासाठी निघून गेली. रात्री १० च्या सुमारास दरवाजा लोटण्याचा आवाज आला. महिलेने दरवाज्याकडे धाव घेतली असता तिला जावई घरात येताना दिसला. यानंतर जावयाने सासूवरच बलात्कार करून मारहाण देखील केली. त्यानंतर जावई मोटारसायकलने निघाला. जावई  मुलीला मारहाण करेल या भीतीने सासू त्याच्या मागे पळत गेली असता शास्त्रीनगरजवळील वन विभागाच्या क्षेत्रात जावयाने सासूला पुन्हा मारहाण केली. रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या नागरिकाने हा प्रकार पाहिला, तेव्हा जावई तेथून पळून गेला. महिला घरी आली आणि झालेला सर्व प्रकार तिने सागितलं यावर घरातील लोकांनी पोलिसांना कळवत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
( जावयाच्या नावामुळे त्या घरातील पिडीत , तिची मुलगी यांचे नाव समोर येथील त्यामुळे  यांची बदनामी होवू नये म्हणून आम्ही बातमीत नाव दिले नाही.)

disturbing soninlaw rapes motherinlaw nashik nandgoan

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.