जिल्हा कबड्डी स्पर्धा : सांस्कृतिक क्रीडा मंडळ, रुद्रा, रचना व शिवशक्ती अंतिम फेरीत

३० वी किशोर व किशोरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०१८

मनमाड : येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर व किशोरी आमदार चषक अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या किशोर गटात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ व रुद्रा क्रीडा मंडळ, ब्राहमणवाडे तर किशोरी गटात रचना स्पोर्ट्स क्लब, नाशिक व शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव यांनी अंतिम प्रवेश केला आहे. सदर स्पर्धेचे आयोजन आमदार छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या सहकार्याने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान मनमाड नगरपालिकेच्या महर्षि वाल्मिकी क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. स्पर्धेत किशोरांच्या ५४ संघांनी तर किशोरींच्या १४ संघांनी सहभाग घेतला आहे. District Kabaddi Championship Manmad Nashik Sports Semi Finals

किशोरांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाने सोनु निकम, हरिष केकान व दर्शन बारे यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर कै. उत्तमराव ढिकले संघाचा ३६ विरुद्ध ३१ असा ५ गुणांनी पराभव केला. पराभूत संघाकडून महेश ढिकले, पंकज ढिकले व तेजस ढिकले यांनी पराभव टाळण्याकरिता प्रयत्न केले.

District Kabaddi Championship Manmad Nashik Sports Semi Finals
कबड्डी सामन्यातील चुरशीचा क्षण

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रुद्र क्रीडा मंडळ ब्राह्मणवाडे या संघाने जय बजरंग, शिंगवे या संघाचा ५२ विरूध ४४ असा ८ गुणांनी पराभव करून पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. विजय संघाकडून रोशन धात्रक, व अभिषेक माळी, यांनी चांगला खेळ केला. तर पराभूत संघाकडून सिद्धेस्श वाघ व प्रतिक शिंदे यांनी चांगला खेळ केला. District Kabaddi Championship Manmad Nashik Sports Semi Finals

किशोरी गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे शिवशक्ती आडगाव या संघाने राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा लभडे, व अंकिता जाधव यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर श्री साई स्पोर्ट्स क्लब नवीन नाशिकचा २७ विरुद्ध ५ असा दणदणीत २२ गुणांनी पराभव करून दिमाखदार पद्धतीने अंतिम फेरी गाठली.

तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रचना स्पोर्ट्स क्लब नाशिकने सांघिक खेळाच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनी नाशिकचा ५६ विरुद्ध २५ असा दणदणीत ३१ गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. District Kabaddi Championship Manmad Nashik Sports Semi Finals

किशोरांच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे –

1) रुद्र क्रीडा मंडळ, ब्राह्मणवाडे विजयी विरुध्द आनंदेश्वर व्यायामशाळा पंचक नाशिकरोड (४०-१४)

2) जय बजरंग क्रीडा मंडळ, शिंगवे विजयी विरुध्द युवा स्पोर्ट्स, नवीन नाशिक (५०-४९)

3) कै. उत्तमराव ढिकले क्रीडा मंडळ, सैय्यद पिंप्री विजयी विरुद्ध ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव–ब (५३-४४)

4) सांस्कृतिक क्रीडा मंडळ मनमाड विजयी विरुध्द क्रीडा प्रबोधिनी, नाशिक-ब (३५-३०)

किशोरी गटांचे उपांत्य पूर्व फेरीचे सामन्याचे निकाल पुढीलप्रमाणे –

1) शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव विजयी विरुद्ध गुलालवाडी व्यायामशाळा नाशिक (२५-५)

2) रचना स्पोर्ट्स क्लब, नाशिक विजयी विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ-ब आडगाव (४४-०)

3) क्रीडा प्रबोधिनी, नाशिक विजयी विरुध्द क.मा.का. विद्यालय, नांदगाव (३२-१६)

4) श्री साई स्पोर्ट्स नवीन नाशिक विजयी विरुध्द जय हिंद क्रीडा मंडळ, (३४-१०)

स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. रवींद्र मोरे, प्रा. दत्ता शिंपी, राजीव डमरे, मोनू गांजे, मनीष केदारे, राजेश निकुंभ, अनिल अहिरे, सुधाकरर कातकाडे, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सुर्यवंशी, विजय ढिकले, संतोष मते, मेघनाथ माळोदे, अशोक गरुड, आदी प्रयत्नशील आहेत.

District Kabaddi Championship Manmad Nashik Sports Semi Finals
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.