दिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)

दिशा पाटणी तिच्या अभिनया पेक्षा तिचा बिकिनी लुक आणि टायगर श्रॉफ मुळे जास्त चर्चेत असते, आता पुन्हा तिने असाच चावट पणा केला असून, जगात अंतर्वस्त्रे बनवणाऱ्या केल्विन क्लेन या कंपनीचा ब्रा घालत सोबत भारतीय लेहेंगा घातला आहे. आणि दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी सणात अश्या प्रकारे शुभेच्छा तिच्या सोशल मिडीयावर अंगावर आल्या असून या प्रकारे जाहिरात केली म्हणून अनेकांनी तिची कान उघडणी केली, तेव्हा तिने हा फोटो काढून प्रायवेट केला आहे.

हा आहे तिचा फोटो :

हा फोटो ट्रोल

दिशा पाटनीने दिवाळीनिमित्त एका फॅशन ब्रँडसाठी फोटो शूट केलं होतं. या फोटो शूटमध्ये तिनं फेस्टिव्ह ड्रेस घातला आहे खरा आणि हातात पणती घेऊन हे शूट केलं गेलं. पण तिनं ब्लाउजऐवजी स्पोर्ट्स ब्रा फक्त घातली आहे. यामुळेच लोकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्यात. काही लोकांनी तिच्या बोल्डनेसचं कौतुक केलंय तर काही लोकांनी टीका केली आहे. यात टीकेचं प्रमाण वाढतं आहे. म्हणूनच सोशल मीडियावर  ती चर्चेत आली आहे.

दिशाने कमी कपड्यांत हातात दिवा घेतल्यामुळे दीपावलीसारख्या पवित्र सणाचा अपमान केला असल्याचं सोशल मीडियावर बोललं जातं आहे. काहींनी अशाही कमेंट केल्या आहेत की, ‘कॅमेरामनला एवढी घाई झाली होती की, त्यानं दिशाला पूर्ण कपडे घालू दिले नाहीत’.

सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत येणारी दिशा पाटनीवर आता टीकेचा भडिमार सुरू आहे. सध्या ती सलमानच्या ‘भारत’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. भारत सिनेमामुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी दिशा आता  टीकेच्या जाळ्यात अडकली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “दिशा पटनीचा सणात लेहेंगा आणि “त्यात” फोटो, झाली ट्रोल ( फोटो फिचर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.