दिव्यांग सायकलीस्टस प्रदीपकुमार सेन करतोय भारत भ्रमंती; नाशिकमध्ये गौरव

सायकलवर १५००० किमीचा प्रवास आणि भारतभ्रमंती

नाशिक : रेल्वे अपघातात आपला पाय गमावलेल्या प्रदीपकुमार सेन मिरदवाल हिम्मत न हरता हवे ते लक्ष्य साध्य करणे काहीही अवघड नाही असा संदेश देण्यासाठी भारत भ्रमंती करण्यासाठी इंदौरहून निघाला आहे. १२०० किमीचा प्रवास सायकलवर करत तो काल नाशिकमध्ये पोहचला.

यावेळी नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, डॉ. नितीन रौदळ, डॉ. मनीषा रौदळ योगेश शिंदे, महेश काक, सेन समाज ट्रस्टचे टोकशिया, तंवर आदींनी त्याचे नाशिक नगरीत स्वागत केले. disabled pradipkumar sen miradwal indore indiatour cyclists 15000km nashik city

दिव्यांग हित, स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन असे विविध बाबींचा प्रचार करत २७ वर्षीय प्रदीप कुमार १५००० किमीचा प्रवास सायकलवर करणार आहे. याद्वारे तो गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्रदीप १४ नोव्हेंबर पासून या यात्रेसाठी निघाला आहे. या प्रवासादरम्यान ३५ किलोची बग सोबत घेऊन तो सायकलवर प्रवास करत आहे. नाशिक शहरात झालेले स्वागत बघून प्रदीप भारावला होता.

disabled pradipkumar sen miradwal indore indiatour cyclists 15000km nashik city प्रदीपकुमार सेन मिरदवाल १५००० किमीचा प्रवास भारतभ्रमंती

प्रदीपची भारत भ्रमंती अनेकांना प्रेरणा देऊन जाणारी असून वेगळे काही करण्यासाठी त्याने सायकल वरचा प्रवास निवडल्याने पर्यावरण, दिव्यांगाबाबतचा संदेश पोचण्यास वेळ लागणार नसल्याची प्रतिक्रिया नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी दिली आहे.

डॉ. रौदळ यांनी प्रदीपची वैद्यकीय तपासणी करून देत त्याला पुढच्या प्रवासासाठी नव्याने उर्जा दिली आहे. त्यांनी सायकल प्रवासात लागणारे साहित्यही प्रदीपला भेट दिले आहे. आज सकाळी प्रदीप पुढील भ्रमंतीसाठी घोटीच्या दिशेने रवाना झाला आहे.

यावेळी सेन समाज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र टोकशिया, राजेंद्र तंवर यांच्यासह प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद, बबलू मिर्झा उपस्थित होते. प्रहर संघटनेचे प्रशस्तीपत्र देऊन प्रदीपला गौरविण्यात आले.

फेसबुक वर आम्हाला लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.