नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विभागात सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक यांना सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये दिपावली च्या पार्श्वभुमीवर दिनांक-29/10/2016 ते दि.06/11/2016 या कालावधीत विशेष स्वच्छता आठवडा मोहिम राबविणेत येत आहे. यादरम्यान विभागातील सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता निरीक्षक,मुकादम तथा स्वच्छता कर्मचारी यांना सुचना देवून या विशेष मोहिमेप्रसंगी दिवस रात्र स्वच्छता राबवून, घंटागाडी बाबत विशेष नियोजन करावे तथा विभागनिहाय 5 घंटागाडया उपलब्ध कराव्यात जेणेकरुन नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभाग हा कचरा मुक्त विभाग करणेबाबतचे धोरण दिपावली कालावधीत आखणे शक्य असून स्वच्छता राखली जाईल याची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत.