दिंडोरी येथील “फर्टीलायजर गॅग”: १३ लाख रुपयांचा माल जप्त

किटकनाशके चोरांची टोळी सक्रीय,  १३ लाखांचा माल जप्त

नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशकांची दुकाने फोडून औषधे लंपास करणाऱ्या दिंडोरी येथील “फर्टीलायजर गॅग” टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अटक करत जवळपास  साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केली आहे.

ही टोळी शेती उपयुक्त औषधे, किटकनाशक / बुरशीनाशक रसायने व पावडर नाशिक जिल्हयात गेल्या काही महिन्यांपासुन निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, चांदवड, ओझर परिसरातील पेस्टीसार्इड विक्रेत्यांचे दुकानांतून रात्रीच्या वेळी दुकाने फोडुन महागडे औषधे चोरी करत होते.

या आरोपिनीच्या घराची झडती घेतली असता ७ लाख २९ हजार ५०० चा रु माल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच गुन्हा करतांना वापरलेली तवेरा, दुचाकी, छोटा हत्ती असा ऐकून १३ लाख २४ हजार ५०० रु. माल जप्त केला आहे. यातून एकूण ११ घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून हे आरोपी सराईत असून अजून गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे.

संशयित आरोपी : १. सोपान दिनकर बस्ते सिदवड दिंडोरी, २. राहुल भाऊसाहेब मोरे दिंडोरी, ३. शुभम नामदेव गवे खतवड दिंडोरी, ४. सतीश अरुण मोरे कसबे सुकेणे दिंडोरी तवेरा वाहनाचा वाहनचालक खंडेराव पोपट कडाळे ४० तिसगाव दिंडोरी, किरण अशोक गायकवाड दिंडोरी, गुलाब निवृत्ती लांडे दिंडोरी यांना ताब्यात घेतले आहे.

या सर्वानी दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी चोरी केलेली काही शेती उपयुक्त औषधे ही लहू बस्ते आणि ज्ञानेश्वर गणोरे यांना कमी किंमतीती विकल्याची कबुली दिली असून त्यांना ही पोलिसांनी दिली आहे.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी याबाबत आढावा घेत विशेष पथक स्थापन केले या नुसार कारवाई केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.