डिजीटल व्यवहाराने सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती आणली – भामरे

डिजीटल व्यवहाराने सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती आणली भामरे

नाशिक : डिजीटल व्यवहाराने केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती आणली आहे. अशा व्यवहारांना गती देण्यासाठी डिजीधन मेळा उपयुक्त आहे असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित डिजीधन मेळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नीती आयोगाचे सहसचिव विक्रम गौर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमचे उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव, सौरभ तोमर आदी उपस्थित होते.

नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. कॅशलेस व्यवहार हे त्यापुढचे महत्वाचे पाऊल आहे. देशाच्या विकासासाठी अशा बदलांचा स्विकार समाजाकडून होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी डिजीधन मेळावा उत्तम संधी असल्याचे भामरे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात जनधन खाते उघडणे, आधार कार्ड अनिवार्य करणे, लाभार्थ्याच्या बँक  खात्यात थेट रक्कम जमा करण्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. देशातील 100 शहरात आयोजित होणाऱ्या मेळ्याद्वारे रोखरहित व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून त्याचा लाभ सामान्य जनतेच्या विकासासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात डिजीटल व्यवहरांना चालना देण्यात येत असून विविध बँकांच्या 400 पेक्षा जास्त शाखांनी प्रत्येकी एक गाव रोखरहीत व्यवहारासाठी दत्तक घेतले आहे. मेळ्यात विविध 80 कक्षांच्या माध्यमातून डिजीटल व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात आली आहे, अशी माहिती अहिर  यांनी दिली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी मेळ्यात लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेच्या सोडतीद्वारे अनेकांना पुरस्कार मिळविण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोडतीद्वारे लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेतील भाग्यवंतांची नावे काढण्यात आली. एकूण 14 कोटी व्यवहारांमधून 30 हजार व्यवहारांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली. ग्राहक आणि व्यावसायिकांच्या खात्यावर जमा करण्यात येणाऱ्या एकूण पुरस्काराची रक्कम 9.8 कोटी आहे. त्यापैकी 15 हजार ग्राहकांना दैनिक सोडतीत एक हजाराचे पारितोषिक तर ग्राहकांसाठी साप्ताहीक सोडतीत 3.8 कोटींची पारितोषिके वितरीत करण्यात आली. व्यावसायिकांमधून 50 हजाराची एकूण 500, पाच हजाराची दीड हजार आणि अडिच हजाराची एकूण पाच हजार भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव चापडगावचा सत्कार करण्यात आला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.