हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज होत अखेर नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.पार्श्वसंगीत ते चित्रपटातील प्रमुख दृश्यांमध्ये समानता आढळत असल्याने आता नवीन काय पाहायला मिळणार आहे.Dhadak Official Trailer |Janhvi & Ishaan Shashank Khaitan Karan Johar
या ट्रेलरमध्ये इशान खट्टरच्या तुलनेत जान्हवी कपूर ट्रेलरमध्ये तरी फारशी कमाल काही दिसत नाही. फार सुमार अदाकारी तिने दाखवली आहे. मात्र खरे चित्र चित्रपट पाहिल्यानंतरच अधिक स्पष्ट होणार आहे. खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा या ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये चांगलाच भाव खाऊन गेले आहेत. सैराटचं वैशिष्ट्य असलेलं कॅमेरावर्क ट्रेलर पाहिल्यानंतर सुखावणारं वाटतंय. थोडक्यात सैराटची हुबेहुब नक्कल असलेला धडक प्रेक्षकांच्या मनात किती धडक देणार ते २० जुलै नंतरच कळणार आहे.
फोटो फिचर :
Dhadak Official Trailer Janhvi & Ishaan Shashank Khaitan Karan Johar