पूजेच्या वादातून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकास पुरोहिताने चोपले

त्र्यंबकेश्वर : येथे कालसर्प शांती पूजा करण्यासाठी आलेल्या इंदोर येथील भाविकास पुरोहितानेच जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये ‘कौस्तुभ विकास मुळे’ या पुरोहितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार प्रसाद पटेल (राहणार – इंदौर) हे 29 जानेवारीला पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला आले होते. त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता संशयित मुळे यांनी माझ्याकडे सर्व पूजा केल्या जातील असे फिर्यादीस सांगितले. किती पैसे होतील असे विचारले असता पुरोहिताने 3 हजार होतील असे सांगून पूजा पूर्ण केली.

devotee beaten by purohit tryambakeshwar, पुरोहिताने भविकास चोपले, त्र्यंबकेश्वर, पूजा, कालसर्प, पोलीस स्टेशन, kalsarp pooja

मात्र पुरोहितांनी पैसे देताना पाच हजाराची मागणी केली. त्यामुळे दोघात वाद होऊन पुरोहिताने फिर्यादि पटेल याना चोप दिला. तसेच त्यांच्या 9 वर्षीय मुलीसही धक्काबुक्की केली. यानुसार पोलिसांनी कलम 323, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असला तरी हे प्रकरण भलतेच असल्याची चर्चा त्र्यंबकेश्वर गावात रंगली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “पूजेच्या वादातून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकास पुरोहिताने चोपले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.