शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय

शिवराय ते भिमराय जन्मोत्सव २०१८  decision celebrate Shivrajaya Bimarai Janmotsav 2018 held jointly

नाशिक: सध्या महाराष्ट्रातील जातीय तणाव पाहता नाशिक मधील काही परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरुणांपर्यंत या महापुरुषांचे खरे विचार पोहचविण्यासाठी शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. decision celebrate Shivrajaya Bimarai Janmotsav 2018 held jointly.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरुषांनी सर्व समाजासाठी काम केलेले आहे. परंतु काही समाजकंटके या महापुरुषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपूर्वक विष कालविण्याच काम करत आहे. व सामाजिक शांतता भंग करत आहे. आणि हे मागील काही दिवसात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होतच आहे.
आणि त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरुषांच्या नावे फूट पाडणाऱ्या विषारी प्रवृत्तींना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी “शिवराय ते भीमराय जन्मोत्सव 2018” साजरा करण्याचे नाशिक मधील परिवर्तनवादी पक्ष संघटनांनी ठरविले.

दिनांक 08-02-2018 रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालय (गडकरी चौक) येथे यावर बैठक घेण्यात आली. व त्यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले.

(1)19 फेब्रुवारी शिवजयंती, 11 एप्रिल फुले जयंती व 14 एप्रिल भीमजयंती या समितीद्वारे साजरी केली जाईल.

(2) येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातुन निघणाऱ्या शिवपालखी सोहळ्यात “शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८” समिती तर्फे पाणीवाटप करण्यात येईल व डॉ.आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचारांचे फलक एकत्रितरित्या प्रदर्शित करून समाजप्रबोधन करण्यात येईल.

(3) तसेच “शिवराय ते भीमराय” याविषयावर निबंधस्पर्धा व विडिओ ब्लॉग स्पर्धा घेण्यात येईल.

(4)या उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंघ, छात्रभारती, मार्शल ग्रुप, विवेकवाहिनी या पक्ष-संघटनांचा सहभाग असून इतर अनेक संघटना-पक्ष यांनी यात सामील व्हावे व आपल्या सूचना द्याव्यात. असे आवाहन आम्ही या पत्रकाद्वारे करत आहोत.

(5)समितीची पुढील बैठक 10 फेब्रुवारी ला रमाबाई आंबेडकर विद्यालय (गडकरी चौक), नाशिक येथे सायंकाळी 5 वाजता होणार असून इतर सर्व पक्ष-संघटनांनी या उपक्रमात सामील होण्यासाठी या बैठकीस उपस्थित रहावे व सामाजिक ऐक्यासाठी आपले योगदान द्यावे.

या बैठकीत राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेश कापसे, सुरेश नखाते, अभिजीत गोसावी, विशाल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, ऍड. सुशांत परघरमोल, अॅड शरद कोकाटे, विराज देवांग, करुणासागर पगारे, जावेद शेख, अश्फाक तांबोळी आदी उपस्थित होते.


प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.