दत्तू भोकनळ देतोय बारावीचा पेपर : लासलगाव येथील केंद्र

लासलगाव : तळेगावरोही (चांदवड) येथील रोईंगपटू दत्तू भोकनळ सहा वर्षांच्या खंडानंतर लासलगाव येथील केंद्रावर बारावीचा पेपर देत आहे. दत्तूने कालच पार पडलेल्या खुल्या ऑरगोमिटर राष्ट्रीय चॅम्पियशनशिप स्पर्धेत रोईंग क्रीडाप्रकारात सुवर्ण पदक पटकवल्यानंतर लगेचच तो परीक्षा देण्यास लासलगावमध्ये दाखल झाल्याने त्याचे कौतुक होत आहे. सैन्यातील नोकरी व रोईंगचा सराव यात दत्तूला पुरेसा वेळ न मिळाल्याने दत्तूने यावर्षी परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला घेतला होता आणि आज तो परीक्षेस बसला आहे.

दत्तूने आज इंग्रजीचा पेपर दिल्यान्त्र तो सर्व विषयांचे पेपर देणार असल्याची माहिती दत्तूचे मामा रविंद्र वाकचौरे यांनी दिली आहे. ज्ञानेश्वर माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही येथून 17 नंबर फॉर्म भरून परीक्षा देत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.