datar genetics lab दातार जेनेटिक्स लॅब कोरोंना टेस्टिंग प्रकरण आणि पाचशे कोटींचा मानहाणीचा दावा

दातार जे नेटिक्स लॅबमधील अहवालाची शासकीय लॅबमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील आदेशापर्यंत कोरोना स्वॅब टस्टींग करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईवर आक्षेप घेत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवरच आब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाारा दिला. टेस्टींग बंद करण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही पुर्वसूचना किंवा संधी दिली नसल्याचा आरोपही करण्यात आला.datar genetics lab coronation testing case and Rs 500 crore defamation suit

अहवालात गंभीर तफावत : – nदातार कॅन्सर जेनेटिक्‍ससोबतच थायरोकेअर, सुप्रिम डायग्‍नोस्‍टिक येथे होणाऱ्या चाचण्यांसंदर्भात संशय व्‍यक्‍त केला आहे. जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणामार्फत जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी आदेश जारी केले आहेत. त्यात म्‍हटले आहे, की मे. दातार आरटीपीसीआयर प्रयोगशाळेने पुनश्‍च आयसीएमआर व एनआयव्‍ही या शासकीय संस्‍थांकडून प्रयोगशाळेची व उपलब्‍ध यंत्र सामग्रीचे प्रमाणीकरण करावे. या प्रयोगशाळेचे संपूर्ण कामकाज विहित मार्गदर्शक तत्त्वे आणि मापदंडाप्रमाणे होत आहे की नाही याबाबत संबंधित शासकीय संस्‍थांकडून फेरप्रमाणीकरण करून घेत अहवाल कार्यालयास सादर करावा. दातार प्रयोगशाळा कायमस्‍वरूपी बंद का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा आस्‍थापना चालकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. अप्रमाणित कार्यपद्धती अनुसरणे, अहवालात दिसून आलेली गंभीर तफावत तसेच, सर्वाधिक नमुने तपासले जात असल्‍याने चुकीचे अहवाल दिल्‍यामुळे होणाऱ्या परिणामांची सर्वाधिक व्‍याप्ती विचारात घेता या सर्व बाबी जनआरोग्‍याच्‍या दृष्टीने घातक आहेत, असा ठपका ठेवला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांविरुध्द पाचशे कोटींचा मानहाणीचा दावा:- 

शासकीय आणि खाजगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यामध्ये तफावत अढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दातार जेनेटिक्‍स यांच्‍याकडे कोरोनाच्‍या चाचण्या करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.  यानंतर दातार लॅबकडून जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांविरुध्द पाचशे कोटींचा मानहाणीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तसेच दातार जेनेटिक्सकडून त्यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही एकतर्फी असल्याचे म्हणण्यात आले आहे. प्रकरणात प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, कारवाई करताना शासकीय लॅबमघ्ये फेर चाचणी केल्याचा तपशील देण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाला रोखण्यात कमी पडलेल्या प्रशासकीय यंत्रणा कातडी वाचवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत. सोबतच दातार जेनेटिक्स लॅबकडे आतापर्यंतच्या सर्व चाचण्याचे नमुने उपलब्ध आहेत. ते नमुने जिल्हाधिकाऱ्यांनी एनआयव्ही या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवावेत, त्यामध्ये फरक अढळून न अल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा तसेच असेही प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.datar genetics lab

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.