दसरा : गावात येताय मग हे सर्व मार्ग बंद आहेत , रावण दहन

दसऱ्या असल्याने दि. 8 रोजी गंगेवरील रामकुंडावर रावणदहनाचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे होणार आहे. या करिता नाशिक वाहतूक पोलीस शाखेतर्फे उद्या दुपारी 3 ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहे. त्यामुळे गावात येतांना बंद रस्त्यांची माहिती नक्की घ्या.  

शहरात दरवर्षी प्रमाणे चर्तुसंप्रदाय आखाडातर्फे रावणदहनाचा कार्यक्रम रामकुंडावर होईल, आखाड्यापासून राम-लक्ष्मण सेनेच्या मिरवणुकीला प्रारंभ सायंकाळी 6 वाजता होणार असून, मिरवणूक मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोडने काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिर ते रामकुंडावरील वाहनतळ मैदानावर मिरवणूक येणार आहे .

या ठिकाणी राम-रावण युद्ध होऊन रावणदहन होते. कार्यक्रमासाठी शहर-परिसरातून सुमारे 10 ते 12 हजार भाविकांची गर्दी पोलिसांनी अपेक्षित ठेवली आहे. सोबतच ओझर येथील नवरात्र मंडळांच्या देवीमूर्तीचे रामकुंडावर विसर्जन देखील दसऱ्याच्या दिवशी केले जाते. दोन्ही कार्यक्रम हे सायंकाळी रामकुंड परिसरात होत असल्याने दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत याठिकाणी भाविकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

हे लक्षात ठेवून त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगेमहाराज पुलापर्यंतची वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली आहे.

गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीला प्रवेशबंदी केली असून, गणेशवाडी-काट्या मारुती पोलीस चौकी, निमाणी बसस्थानक-पंचवटी कारंजामार्गे वाहने मार्गस्थ होतील अशी योजना केली आहे .

मात्र पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी नसेल असे आदेश वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी दिले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.