देशभक्तीपर कार्यक्रम : कार्यक्रमात अश्लीलता, नाचवल्या मुली, सत्ताधारी आमदार उपस्थित

भैय्यांच्या भोजपुरी कार्यक्रमात तिरंग्याचा अपमान, सत्ताधारी आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून देशभक्तीचे धिंडवडे dance party republic day nashik news mla maharashtra

नाशिक : प्रजासत्ताक दिवस म्हणून 26 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची परवानगी घेवून, सिडको येथील कामटवाडे परिसरात भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य करत मुली नाचवल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमात सत्ताधारी पदाधिकारी आणि भाजपा आमदार उपस्थित होते. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या पूर्ण कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. dance party republic day nashik news mla maharashtra

यामध्ये 26 जानेवारी निमित्त नाशिकच्या कामटवाडा परिसरात एका देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात येथे तरुणींचे अश्लील नृत्य आयोजित करण्यात आले होते. तर व्हिडियो जे व्हायरल होत आहेत त्यामध्ये मुलींनी अश्लील हावभाव करत उपस्थितांसमोर नाच केला. तर अनेकांनी यावेळी पैसे सुद्धा उधळले आहे. dance party republic day nashik news mla maharashtra

dance party republic day nashik news mla maharashtra

तर गंभीर म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्याच कार्यक्रत्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं असे समोर आले आहे. तर कार्यक्रमावेळी उपस्थितांनी चक्क व्यासपीठावर जाऊन या तरुणींच्या अंगावर पैसे उधळले. प्रजासत्ताक दिना दिवशी असे प्रकार करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे अनेक नागरिक चिडले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपाचे अपूर्व हिरे विधान परिषदेचे आमदार आहेत.  हा कार्यक्रम होत होता तेव्हा पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि हा खेळ सुरूच ठेवला होता. यातील मुली तसले हाव भाव करत नाचत होत्या.

प्रजासत्ताक दिनी असा अश्लिल प्रकार करताना भाजप कार्यकर्त्यांना लाज कशी वाटली नाही. देशभक्ती आणि संस्कृती यावर भूमिका घेणाऱ्या भाजपच्या आमदाराचे समर्थक असला कार्यक्रम आयोजित करत असतील तर पक्षाने त्यांना का रोखलं नाही असे प्रश्न विचारले आहेत. See Video : Click on it ! dance party republic day nashik news mla maharashtra

फेसबुकवर बघा हा व्हिडिओ : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.