दरोडेखो अटकेत सुमारे 7 लाखांचा माल तर गावठी पिस्तुल काडतूस जप्त (व्हिडियो)

दरोडेखोर,घरफोडे आणि मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी पोलिसांनी पकडली

सुमारे 7 लाखांचा माल तर गावठी पिस्तुल काडतूस जप्त

नाशिक :नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दरोडेखोर,घरफोडे आणि मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी पकडली असून अनेक गुन्हे उघड झाले आहेत. तर त्यांच्या कडून लाखो रुपयांचा माल,गाड्या आणि बंदूक जिवंत काडतुसे जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली असून, एकूण 7  आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नाशिक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार लाखलगाव पेट्रोल पंप येथे पडलेल्या दरोड्यातील संशयित नितीन निव्रुती पारधी (कोळीवाडा,मखमलाबाद) याला पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आडगाव येथे दाखल असलेल्या लाखलगाव पेट्रोल पंप दरोड्याची कबुली दिली होती. त्यानुसार यामध्ये तत्याचा साथीदार २.संभाजी विलास कवळे (रामकृष्ण नगर,अंबड), ३.सोमनाथ हिरामण बर्वे (मातोरी),४.नितीन विलास पिंगळे (मातोरी), ५. अनिल भाऊराव पवार (सैय्यद पिंपरी), ६. शुभम दशरथ गायकवाड (मुंगसरा), 7. देविदास मोतीराम पवार (नवनाथ नगर ) यांनी हा दरोडा केल्याचे कबुल केले आहे.

या सर्वांकडून पोलिसांनी खालील वस्तू जप्त केल्या आहेत.

  • ३०,५००/- एक गावठी पिस्तोल अर्थात कट्टा आणि जिवंत काडतूस
  • १ लाख रु./- एक यामाहा कंपनीची स्पोर्ट बाईक
  • ५० हजार रु./- एक सेन्ट्रो कार
  • गुन्हा करत असलेले कपडे

असा एकूण १ लाख ८० हजार पाचशे रुपये माल आढळून आला आहे. तर पोलिसांनी अजून चौकशी केली असता त्या मध्येइतर चोरींचा समावेश दिसून आला आरोपींनी कबुली देत पंचवटी,सातपूर येथून चोरलेल्या ४ मोटार सायकल ताब्यात घेतल्या आहेत.या सर्व २२० सीसी असून त्यांची किंमत एकूण ४ लाख रुपये आहे.

यानंतर यातील आरोपी हे शहरातील विविध भागात वेगवान गाड्या घेवून मोबाईल स्नॅचिंग करत असलेले उघड झाले असून त्यांच्या कडून विविध मोबाईल कंपन्यांचे सुमारे ८० हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत.

इतर कबुल गुन्हे :

  • लासलगाव येथे सोनाराचे दुकान फोडून चोरी विकेलेला माल २० हजार रुपये
  • नाशिक तालुका घरफोडी एक तोळे सोने
  • ३५ हजार रुपयांची लगड तर ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण ३५, ५०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

तर या टोळक्याकडून एकूण 7 लाख रुपये १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईत पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजय मगर,पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळादे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक एन एन मिहिते,सचिन खैरनार,दीपक गिरमे,सहा.पो.फौ.सुभाष गुंजाळ,संजय पाठक, जाकीर शेख, चंद्रकांत सदावर्ते,संजय मुळक आदींनी सयुक्तरीत्या कारवाई पूर्ण केली आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.