नाशिकमध्ये नोट छपाईचे काम जोरात सुरु कामगारांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ

नाशिकमध्ये नोट छपाईचे काम जोरात सुरु  कामगारांच्या महागाई भत्त्यात टक्क्यांची वाढ
नाशिक : नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटेसोबतच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता नोट छपाईचे काम जोरात सुरु झाले आहे. दुसरीकडे या ठिकाणी कामावर असलेले कामगार नोट छपाईसाठी  मोठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत सरकारने कामगारांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
                                     
देशात चलनामधून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यांनतर आता नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये नोटांच्या छपाईचे काम जोरात सुरु झाले आहे. याठिकाणी ५०० रुपयांच्या ४० कोटी नव्या नोटा छापण्याचे काम सुरु असतांनाच आता १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सिक्युरिटी प्रेसमध्ये सुमारे २५०० कामगार काम करत आहेत. त्यांचे नोट छपाईचे काम तीन शिफ्टमध्ये सुरु आहे. तर प्रेसमध्ये दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष नोटांची छपाई करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे सिक्युरिटी प्रेसमधील कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. याआधी नोट प्रेसमधून ५० कोटीच्या ५०० च्या नोटा आरबीआयकडे रवाना करण्यात आल्या आहेत.         
 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.