कृषी मेळाव्यात पिक कर्ज घेण्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या लासलगाव शाखेच्या वतीने आवाहन

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

बँक ऑफ महाराष्ट्र, लासलगाव शाखेमार्फत शेती करिता पिक कर्ज वितरित केले असुन शेतकरी वर्गाने पिक कर्जासह विविध मुदत कृषी कर्ज घेण्याकरीता संपर्क साधावा, असे शाखेचे व्यवस्थापक सनोज कुमार यांनी केले. crop loan pik karj mahabank appeal lasalgaon farmers nashik

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या गावातील शेतकरी वर्गाकरीता कृषी मेळावा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगांवचे व्यवस्थापक सनोज कुमार व कृषी अधिकारी सागर जगताप यांच्या उपस्थितीत तळेगाव रोही ग्रामस्थ यांच्या संयुक्त उपक्रमातुन संपन्न झाला.

कुमार यांनी डिजिटल पेमेंन्ट सक्षम होण्यकरिता करिता आधारलिंक करणे, प्रत्येक व्यक्तीचे राष्ट्रीयीकृत बॅकेत खाते उघडणे, कॅशलेस व्यवहार करणे, मोबाईल बॅकिंग व इंटरनेट बॅकिंग ने व्यवहार करणे,व्यवसायीकांनी ग्राहकांसोबत आधारलिंकने व्यवहार करणे, डेबिट कार्डचा वापर करणे इ. बाबत ग्रामस्थांना माहीती दिली. crop loan pik karj mahabank appeal lasalgaon farmers nashik

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगांवच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती कृषी अधिकारी सागर जगताप यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शंकांचे व समस्या यांचे निरसन लासलगाव शाखेचे व्यवस्थापक सनोज कुमार यांनी केले.
या प्रसंगी संदीप गायकर तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगांवचे वतीने
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे शेतकरी वर्गाकरीता कृषी मेळाव्यात बोलतांना कृषी अधिकारी  सागर जगताप तसेच शाखा व्यवस्थापक सनोज कुमार व  तळेगाव रोही ग्रामस्थ दिसत आहेत. (छायाचित्र समीर पठाण)

crop loan pik karj mahabank appeal lasalgaon farmers nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.