नाशिकच्या स्वच्छता दुतांचा क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार


नाशिक- शहर स्वच्छ ठेवण्ासाठी झटणाऱ्या  घंटा गाडी कर्मचारी व खत प्रकल्प येथील कर्मचाऱ्यां चा आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला.या मागची भूमिका विषद करताना क्रेदाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की निसर्गाचे वरदान लाभलेले नाशिक हे शहर सुंदर आहे . ऊन,पाऊस ,थंडी याचा विचार न करता आपल्या  शहरातील घंटा गाडी कर्मचारी शहर स्वच्छ राहण्यासाठी झटत असतात. सद्य कोविड -१९ च्या परिस्थितीत स्वच्छतेचे महत्व अजूनच वाढले आहे .त्यामुळे या स्वच्छता दुत यांचे  काम हे नाशिक साठी  महत्वाचे आहे .

नाशिक शहराचे ब्रॅण्डिंग करताना येथील वातावरण,उद्योग,सुविधा याच्या सोबतच स्वच्छता देखील महत्वाची आहे व त्याचमुळे या स्वच्छता दुत यांचा सत्कार व आभार नाशिक शहर वासियातार्फे करण्याचे क्रे डाई ने ठरवले असेही रवी महाजन यांनी नमूद केले.नाशिक मधील विल्होळी येथील खत प्रकल्पा मध्ये झालेल्या या कार्यक्रमा च्या वेळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. माळी व सरव्यवस्थापक श्री .त्रिपाठी यांनी शहरातून कचरा गोळा करून त्याचे विलगी करण,प्रक्रिया,खत निर्मिती तसेच त्याचे वितरण याची तसेच संपूर्ण  खत प्रकल्पाची माहिती दिली.या प्रसंगी क्रें डा ई महाराष्ट्र चे सचिव सुनील कोतवाल तसेच क्रे डा ई नाशिक मेट्रो चे अनिल आहेर,अतुल शिंदे,राजेंद्र वानखेडे,अंजन भलो दिया ,राजेश आहेर,नरेंद्र कुलकर्णी,हितेश पोतदार,सागर शाह व विजय चव्हाणाके उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.