सिडको: गाईचा मृत्यू महापालिकेमुळे, महावितरणचे स्पष्टीकरण

सिडको: गाईची मृत्यू महापालीकेमुळे, महावितरणचे स्पष्टीकरण

नाशिकः पवन नगर येथे विजेचा धक्का लागल्याने गाईची मृत्यू झाला होता. त्यामुळे महावितरणची चुकीमुळे हे घडले आहे असे प्रथम दर्शनी तरी दिसत होते. मात्र यावर तपास करत महावितरण ने महापालिकेच्या कामांवर बोट ठेवले आहे. रस्त्याचे चुकीचे काम करत महापालिकेने वीज तार तोडली होती. गुपचूप बुजवली त्यामुळे गाई मृत्यूमुखी पडली असे सांगितले आहे.

मात्र महापालिका आणि महावितरण यांच्या कारभारामुळे आज गाईची मृत्यू झाला, भविष्यात ही घटना घडू नये म्हणून दोषी दोनही कर्मचारी वर्गाला शिक्षा केली पाहिजे असे नागरिक मागणी करत आहे.

महावितरण ने दिलेला पुरावा ही ती धोकादायक तुटलेली तार.

महावितरणचे स्पष्टीकरण : 

सिडको परिसरातील पवननगर येथे विजेचा धक्का लागून गाय मृत्युमुखी पडल्याच्या घटनेसाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना जेसीबीमुळे खराब झालेली केबल कारणीभूत आहे. खराब केबलची कोणतीही माहिती न देता महापालिकेने परस्पर केबल बुजवून रस्त्याचे काम केल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

पवननगर येथील पोलीस चौकीमागे विजेचा धक्का बसून दि. १४ जुलै रोजी एका गायीचा मृत्यू झाला होता. संबंधित ठिकाणी नाशिक महापालिकेकडून जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपूर्वी भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी याठिकाणी रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करीत असताना जेसीबीमुळे सदर ठिकाणची केबल खराब झाली. केबल खराब झल्याबाबत महावितरणला कोणतीही माहिती न देता महापालिकेने केबल बुजवलेली आहे.

महापालिकेकडून संबंधित ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. अपघातस्थळी लोखंडी पाईपच्या टोकाजवळच खराब केबल आढळून आली. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने लोखंडी पाइपच्या टोकाजवळ असलेल्या खराब केबलमुळे हे पाणी विद्युतभारित होऊन पाण्यात उभ्या असलेल्या गायीला विजेचा धक्का बसला.

घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर मिळताच तातडीने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. संबंधित भूमिगत केबलचे काम महापालिकेकडून करण्यात आले तसेच त्यांच्याकडूनच काम सुरु असताना केबल खराब झाल्याने हा अपघात झाला असून यात महावितरणची कोणतीही चूक नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.