आंबा विधान प्रकरण : भिडे नाशिकमध्ये, न्यायालयाने केला जामीन मंजूर, तणावाचे वातावरण

नाशिक – आंबा खाऊन पुत्र प्राप्ती होते असे  वादग्रस्त विधान प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर  भिडे यांना जामीन मंजूर केला आहे.court granted bail sambhaji bhide today next hearing fourting december 2018 nashik

खटला दाखल होऊन अनेकदा  समन्स बजावल्यानंतरही भिडे यापूर्वी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहू शकले नव्हते. या आगोदर संभाजी भिडे यांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती, त्यानंतर भिडे नाशिकच्या न्यायालयात दाखल झाले आहेत. पाटील व भिडे यांची कोल्हापूर येथे कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही. court granted bail sambhaji bhide today next hearing fourting december 2018 nashik

दहा जून रोजी नाशिक येथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आयोजित सभेत ” माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले जन्माला येतात ” असे वादग्रस्त वक्तव्य केले. वादग्रस्त विधानाविरोधात पुणे येथील आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालकांकडे  ‘लेक लाडकी अभियान ‘ या संस्थेने तक्रार केली. तक्रारीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी करत भिडेंच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला.  मा. न्यायालयापुढे हजर आज शेवटी भिडे हजर झाले होते. यावेळी भिडे यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात केला होता. यापुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.court granted bail sambhaji bhide today next hearing fourting december 2018 nashik

प्रतिक्रिया :

“भिडे गुरुजी यांनी त्यांचे वय जास्त असल्याने सुनावणीला उपस्थित राहतांना सवलत मिळावी, कमीत कमी वेळा कोर्टात हजर राहू द्यावे असा अर्ज केला असून, मा. कोर्टात तो अर्ज विचारात आहे. मात्र अजून कोणताही निर्णय झाला नसून, कोर्ट सांगेल त्या दिवशी हजर राहण्याचे मात्र आदेश आहेत.” – भिडे यांचे वकील अविनाश भिडे 

तुम्ही फेसबुकवर आहात मग, आमच्या पेजला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा :

लिंक येथे क्लिक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

court granted bail sambhaji bhide today next hearing fourting december 2018 nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.