डीजे प्रकरण : नगरसेवक गजाजन शेलार पोलिसांना शरण झाले

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डी जे चा दणदणाट करणे नगरसेवक गजानन शेलार यांना चांगलाच भोवला आहे. कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला नव्हता, तेव्हा पासून गजाजन शेलार पोलिसांना सापडले नव्हते मात्र  आज शेलार स्वत:हून सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल होऊन पोलिसाना शरण आले आहे.
काय आहे प्रकरण :-

दंडे हनुमान डॉल्बी प्रकरण  : शेलारांसह चौघे ताब्यात

गणेश विसर्जन मिरवणुकीत कायद्याला आव्हान देत असलेल्या गजाजन शेलार यांच्या दंडे हनुमान मित्रमंडळ  वाजवलेल्या डॉल्बी  विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी  नगरसेवक गजानन शेलार व अध्यक्ष बबलू शेलार यांच्याविरुद्ध भद्रकाली तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून बबलू शेलार तसेच मंडळाचा खजिनदार योगेश जवाहरलाल मदरेले, अक्षद अनिल कमोद, ‘डॉल्बी’चा मालक गणेश तोरे या चौघांना  पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी (दि.५) ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ९७.०२ डेसिबलच्या पुढे ‘डॉल्बी’चा आवाज वाढविला होता. तर पोलिसांनी वारंवार सूचना करून सुद्धा कोणताच प्रतिसाद दिला नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करत दंडे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल ऊर्फ बबलू शेलार यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली.

ध्वनिप्रदूषण व पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ‘डॉल्बी’चा ट्रकही पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. लोखंडे करीत आहेत. खाली दिलेली लिंक क्लिक अथवा प्ले करा पहा त्या दिवशीचा डॉल्बी कसा होता.  

https://www.facebook.com/NashikOnWeb/videos/2042095992742397/

 

 

 

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.