नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना मोठी बातमी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं घेतला आहे. ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.coronavirus vaccine
मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु होत्या. ही भारतातील पहिली लस ठरली. (coronavirus vaccine astrazeneca covishield vaccine approved in india says sources)
कोरोनावर 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी कोविशिल्ड!
कोविशिल्ड या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.
‘कोविशिल्ड’ ची किंमत काय असणार?
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच कोविशिल्डचं उत्पादन करत आहे. सीरममध्ये कोविशिल्डचे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.coronavirus vaccine