- दिवसाला ६० हजार नाशिककरांना करोना लस देण्याची तयारी
- जिल्हाप्रशासनाची तयारी पूर्ण : आराखडा तयारCorona vaccination
नाशिक । प्रतिनिधी नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवरीच्या दुसर्या आठवडयानंतर करोना लस उपलब्ध होणार अशी चांगली शासनानेरणा. त्यानुसार लसीकरची तयातयारी पूर्ण केली अाहे. या साठी जिल्ह्यात शंभरजणांची एक टीम तयार करण्यात आली असुन एक टीम सहाशे लोकांना करोना लस देउ शकते. जिल्ह्याची लोकसंख्या साधारणत: ६० लाख असुन दिवसाला ६० हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता असून तसे नियोजन असल्याचे माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.Corona vaccination
लसीकरण अॅप तयार केले
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत (दि.१९) करोना आढावा बैठक पार पडली. आयआयटी दिल्लीच्या टीमने करोना लसीकरण अॅप तयार केले असून लसीकरणासाठी प्रत्येक नागरिकाला मॅसेज पाठविण्यात येईल. जानेवारीच्या तिसरा आठवडयात लसीकरणाला सुरुवात होईल. लसीकरणासाठी शंभर ६०० टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये शंभरजण असतील. निवडणुकीप्रमाणे ६५० बूथ केले जातील. बुथवर पाच लोक राहतील. एका बुथवर एक दिवशी शंभर लोक लस घेतील.
प्राधान्याने आरोग्य कर्मचार्यांना लस
प्राधान्याने आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाईल. नंतर कोणाला ते ठरविले जाईल. पहिल्याचा सेकंड डोस व इतरांचा पहिला डोस असे नियोजन करावे राहील. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २१ किंवा २८ दिवसांनी घ्यावा लागेल. डोस कधी घेयचा याची मॅसेजद्वारे माहिती दिली जाईल.
प्रत्येकाला लसीकरणाचा येणार मॅसेज
व्हायरस वकसीन, व्हायरस वेकटर व्हाक्सीन, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन बेस व्हकसिन असुन २०३ कंपन्या व्हाक्सीन बनवते आहेत. भारतात तीन कंपन्यांच्या लशीचे प्री क्लिनिकल तर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.
भारत बायोटेक कंपनीची लसची बाबत चाचपणी सुरु आहे.
अस्ट्रेझेनेका किंवा स्पुटनिक डॉस आपल्याकडे चालेल. एकच काही मिळावे असा आग्रह धरावा लागेल. पहिला डोस ज्या लसीचा घेतला त्या लसीचाच दुसरा डोस घ्यावा लागणार. त्याच लसीकरणाची मॅसेज येणार.
- मसल/स्नायू मध्ये देणारी लस
- करोनाची लस ही दंडावर दिली जाईल.
- प्रत्येक बुथवर रुग्णवाहिका तयार ठेवली जाईल.
- प्रत्येक लस ही ४.६ एम एलची असेल.
- प्रत्येक लसत्याच दिवशी संपवावी लागणार.
कोल्ड चेन मेंटेन करून तेथे लस ठेवले जाईल. - सिरिंज ऑटो डिसेंबल आहे.
- एकाला दिली की लॉक होते.
- सिस्टरसाठी ही सीरींज नवीन नाही.
- एका लाभार्थींला दोन डोस.
लसीकरणासाठी तीन कक्षांची व्यवस्था
जिल्हापरिषदेच्या शाळा व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी त्रिस्तरिय कक्षांची विशेष व्यवस्था केली जाईल. पहिला कक्ष वेटिंगसाठी असेल. दुसर्या कक्षात लसीकरण केले जाईल. तिसरा रुम हा लस निरिक्षणासाठी असेल. लस दिल्यानंतर संबंधिताला अर्धा तास थांबविले जाईल. लस दिल्यानंतर नागरिकाला काही त्रास होत नाहिना याची दक्षता घेतली जाइल. या सर्व रूम व्हेंटिलेटेड असतील.
प्रतिक्रिया
करोना लस घेणे हे ऐच्छिक असून बंधनकारक नसेल. लसीकरणाबाबत गैरसमज पसरत आहे. ज्याला स्वता:च्या जीवाची व पर्यायाने कुटूबांची काळजी असेल ती व्यक्ति लस घेईलच. एकदा करोना झाल्यावर तो परत होत नाही हा गैरसमज आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे.
– छगन भुजबळ, पालकमंत्री Corona vaccination