CORONA UPDATE NASHIK शहरातील ही दोन’ हॉटेल्स ताब्यात घेतली

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून मंगळवारी ६९६ वर पोहोचला आहे. यात नाशिक शहरात ३९, ग्रामीण भागात ८५ एकट्या मालेगावमध्ये ५५१, अन्य २१ रुग्ण आहेत. यात निफाडच्या विंचूर येथे दोन दिवसांच्या बाळाला कोरोना झाला आहे. तर मालेगावमधील चंदनापुरीतील १० दिवसांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. जिल्ह्यात ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  CORONA UPDATE NASHIK

CORONA UPDATE NASHIK
STAY HOME STAY SAFE

म्हणून ‘ही’ हॉटेल्स ताब्यात घेतली 

मालेगावमध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या वैद्यकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पण यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील हॉटेल सिटी प्राईड व हॉटेल राजदूत ही दोन हॉटेल्स ताब्यात घेण्यात आली आहे. या हॉटेल्समध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासासह इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहे. सोबतच त्यांच्या व्यवस्थापनची जबाबदारी हॉटेलमालकांवर सोपविण्यात आली आहे. तर वैद्यकीय साधन सामुग्री जिल्हा शल्य चिकित्सकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  CORONA UPDATE NASHIK

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.