Corona Bhujbal Mumbai office भुजबळांच्या मुंबई कार्यालयातील 6 अधिकारी कोरोना बाधित; भुजबळ होम क्वारंटाईन

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांच्या मुंबई कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्री छगन भुजबळ होम क्वारंटाइन झाले आहेत. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. Corona Bhujbal Mumbai office

राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. Corona Bhujbal Mumbai office


इथे क्लीक करून नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची घ्या माहिती…

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.