sanitation booths क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शहरातील महत्वाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन बूथची उभारणी

नाशिक – आपल्या विविध उपक्रमातून नेहमीच  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो या बांधकाम व्यवसायिकांच्या संस्थेद्वारे  सध्या सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन बूथ ची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे  अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय, नाशिक मनपा चे विभागीय कार्यालये तसेच शहरातील महत्वाची रुग्णालये  येथे सॅनिटायझेशन बूथ उभारण्यात आले आहे.sanitation booths
याबाबत अधिक माहिती देतांना उमेश वानखेडे म्हणाले की, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी, नर्सेस, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, पोलिस दल हे सर्व  नेटाने काम करीत आहेत. पण  त्यांना सहकार्यासाठी  आपणही  काही केले पाहिजे या भावनेने उत्कृष्ट दर्जाचे “फुल बॉडी सॅनिटायझेशन बूथ” हे क्रेडाई नाशिक मेट्रोने काही स्थानिक व्यवसायीकाकडून  तयार करून  घेतले आहेत .sanitation booths

जिल्हाधिकारी कार्यालय


शरीराचे सॅनिटायझेशन सोबत  कोरोनाच्या लढ्यासाठी  हात धुणे देखील  हे अतिशय महत्वाचे असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  सॅनिटायझेशन बूथची उभारणी करताना  शरीर सॅनिटायझ झाल्यानंतर  बूथ च्या  बाहेर पडताना हात धुण्याची/ सॅनिटायझ करण्याची  सोय देखील येथे करण्यात आली आहे .
या  मध्ये बूथ व टनेल अश्या दोन प्रकारची सॅनिटायझेशन ची व्यवस्था करण्यात आली आहे . या पैकी एक   ४ फुट x  ४ फुट आकाराचे बूथ पूर्णपणे स्वयंचलित असून यामध्ये एक व्यक्ती  १५ सेकंद उभे राहून स्वत भोवती गोल फिरल्या नंतर  आपोआप ३० मायक्रोन सॅनिटायझेशनची फवारणी होते. त्यामुळे  व्यक्ती ओले न होता आवश्यक तितका  निर्जंतुकीकरणाचा फवारा होतो  . बूथ मध्ये खालील बाजूस  अल्ट्रा वॉयलेट ट्यूब लावली असून त्यामुळे पादत्राणे देखील निर्जंतुक होण्यास मदत होते.  हे बूथ उभारतांना यामध्ये ३०० लिटर क्षमतेची अंतर्गत  पाण्याची टाकी, २ एच पी ची मोटर, पिस्टन पंप, इम्पोर्टेड नोझल, सेन्सर व अल्ट्रा वॉयलेट ट्यूब लावले आहेत. बूथच्या बांधणीसाठी ४० मिमी CRCA पाईप्स तसेच अग्नि व जलरोधक असणाऱ्या १० मिमी चे व्ही सिमेंट बोर्ड वापरले असल्याने ते अनेक वर्ष टिकू शकते.
दुसऱ्या प्रकारचे बूथ हे  ८ फुट x १० फुट आकाराचे  सॅनिटायझेशन टनेल असून  ते पण स्वयंचलित असून या टनेल मध्ये वरील बूथ सारखीच वैशिस्ठ्ये आहेत . याच्या  मोठ्या आकारामुळे याचा वापर एकाच वेळी एकाहून अधिक व्यक्ती करू शकतात. अश्या प्रकारचे ४ टनेल हे नाशिक मनपा च्या  विविध रुग्णालय व कार्यालय येथे बसविण्यात आली  आहेत.
हे बूथ उभारण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच पोलिस आयुक्त यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असून याचे डिझाईन आर्की. पंकज देव यांनी, आत मधील यंत्रणा समीर लोढा यांनी व बांधणी क्रेडाई सदस्य मुकुंद कुरुमबट्टी यांनी केली आहे.याचे समन्वयन क्रेडाई नाशिक मेट्रोने केले असून  संपूर्ण  आर्थिक भार देखील  क्रेडाई नाशिक मेट्रोने उचलला आहे.सदर १० बूथ उभारणीसाठी साधारणत: एकूण पाच लाख रुपये  खर्च आला असल्याचेही उमेश वानखेडे यांनी नमूद केले .
क्वारंटाईन शेड देखील उभारणार –
   बूथ उभारण्यासोबतच क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे प्रशासनास सहकार्य म्हणून क्वारंटाईन शेड उभारण्याची तयारी दाखवली असून त्यास मनपाने मंजुरी दिली आहे. जशी गरज पडेल तसे हे काम सुरु करण्याबाबत क्रेडाई नाशिक मेट्रोला मनपा तर्फे सांगण्यात येणार आहे . या क्वारंटाईन शेडसाठी तपोवनातील मनपा हॉस्पिटल जवळील लक्ष्मी लॉन्स चे संचालक श्री. काकड यांनी हॉल उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये ५० शेड क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सूचनेनुसार  उभारण्यात येतील असेही उमेश वानखेडे यांनी सांगितले.
बांधकाम मजुरांची काळजी 
क्रेडाई नाशिक मेट्रो चे सर्व सभासद यांच्या तर्फे प्रशासनाचे सर्व नियम पाळण्यात येत असून अनेक बांधकाम साईट वर असलेल्या मजुराची देखील अन्यधान्य ,आरोग्य व निवारा अशी  योग्य ती  काळजी घेण्यात येत असल्याचे देखील वानखेडे यांनी सांगितले .
या  सर्व उपक्रमासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर, अनंत राजेगावकर, नेमीचंद पोद्दार, सुरेश पाटील, किरण चव्हाण व सुनील कोतवाल यांचे मार्गदर्शन असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष रवी महाजन, मानद सचिव कृणाल पाटील व सर्व कार्यकारिणी सभासदांचे सहकार्य लाभले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.