“मराठी बिग बॉस’ च्या विरोधात तक्रार दाखल : अश्लीलता पसरवली जातेय

नाशिक : सध्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बिग बॉसया रिअॅलिटी शोमधील स्पर्धक अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये अश्लील वर्तन केल्याप्रकरणी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. रेशम टिपणीस आणि यांनी राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं उल्लंघन करणारे असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सोबतच  आता कुटुंबियांसोबत बसून बघण्यासारखा राहीलेला नाही असं त्यांनी नोंदवलेल्या आक्षेपात म्हटलं आहे. ते शहरातील विधी महाविद्यालयात शिकत आहेत.complaint lodge against marathi bigg boss sexual content 

सदरच्या तक्रारीत म्हटले आहे की, १४ मे रोजी चॅनल सर्फिंग ‘बिग बॉस’ शो सुरु होता. सध्या शो ची जोरदार चर्चा सूरु आहे. त्यामुळे कुटुंबांसह बिग बॉस बघत असताना दोन्ही कलाकारांचे प्रेमाचे संवाद आणि आक्षेपार्ह वर्तन सुरु झाले. दोघे विवाहित असताना त्यांचं वर्तन विवाहबाह्य संबंधाना खतपाणी घालणारं आहे असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली रेशम टिपणीस ही घटस्फोटीत असून तिला दोन मुले आहेत. तर राजेशचंही लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. राजेश आणि रेशम हे पहिल्या दिवसापासून एकमेकांसोबत वावरत होते. मात्र गेल्या काही आठवड्यात त्यांचे नाते एक पाऊल पुढे गेले असून त्या दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. राजेशने तर कॅमेरासमोर आपल्या बायकोला त्याचे रेशमवर प्रेम असल्याचे सांगितले आहे. राजेशच्या मांडीवर बसणे, एकमेकांची चुंबने घेणे, मिठ्या मारणे, सतत एकमेकांच्या अवतीभोवती फिरणे असे प्रकार सुरू असतात असे म्हटले आहे. त्यामुळे संबंधित चित्रफितीची चौकशी व्हावी  तसेच कलर्स वाहिनीचे संचालक, निर्माते आणि दोन्ही कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात ऋषिकेश देशमुख यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi Your Name and city  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.