भाजपच्या अंतर्गत कलहावर मुख्यमंत्री यांचे तुकाराम मुंढे अस्त्र

अनेक कामे प्रलंबित , सत्ता असून प्रत्येकाचे गट cm devendra fadnavis tukaram munde nashik bjp work done city

नाशिक महापलिकेत सत्ता एकहाती भाजपाची आहे. तर आमदार सुद्धा भाजपाचे आहेत. या सर्व ताकदीचा उपयोग पक्षाला होण्या आगोदर त्याचा तोटा दिसून येत आहे. अंतर्गत कलह आणि ज्यांना पक्षात घेतले त्यांचा इतरांसोबत वाद यामुळे पक्षाला मोठा फटका बसतो आहे. तर जी कामे नाशिकला होणे गरजेचे होते ती दिसत नसून   राज ठाकरे यांच्या काळात झालेल्या कामांना समोर ठेवून महापालिकेची घोडदौड सुरु आहे. त्यामुळे आता दत्तक नाशिकला कामे पूर्ण करत या अंतर्गत कलहाला दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे अस्त्र वापरले आहे. यामुळे एकतर सर्व लोकसेवक यांच्या विरोधात एक होतील किंवा तुकाराम मुंढे नेहमी प्रमाणे विजयी होतील. cm devendra fadnavis tukaram munde nashik bjp work done city.

 नाशिक महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंढे यांचा इतिहास बघता आणि त्यांची कामाची पद्धत लक्षात घेता अधिकाऱ्यांना मात्र धडकी भरली आहे. तर दुसरीकडे नाशिककरांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक भाजपात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कुरबुर आणि पालिकेचा कारभार काही ठराविक लोकांच्या हाती एकवटल्याची चर्चा यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली होती.

तुकाराम मुंढेंच्या निमित्ताने भाजप स्वतःची डागाळलेली प्रतिमा उंचावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. आता शिवसेनेला जोर आला सून शिवसेना भाजपा विरोधात जोरदार विरोध करेल असे चित्र आहे. तर दुसरीकडे  महापालिकेवर असलेला ८००  कोटींचा स्पिल ओव्हर, शहरातील पाणी पुरवठा नियमित करणे, बस सेवेसाठी पुढाकार घेऊन ठोस निर्णय घेणे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देऊन त्याचा ताळेबंद ठेवणे, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करणे  यासारख्या मोठ्या आव्हानांना मुंढे यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुंढे यांना काम करू दिले तर नाशिक तीन वर्षात नक्कीच एका चांगल्या स्थितीत असेल अशी आशा नागरिकांना आहे.

——————————————————————————————————————

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.