तुकाराम मुंढेंच्या गाळेधारकांवरील कारवाईला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

नवीन सुधारित नियमावली येई पर्यंत कारवाई थांबवण्याचा आदेश

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर तिजोरीत असलेला खडखडाट बघून कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता या त्रिसूत्रीच्या आधारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामकाज सुरु करून थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून रेडिरेकनर दरानुसार भाडेवसुली सुरू करून महापालिकेच्या व्यापारी संकुलातील ११०० गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा बजावण्याची कारवाई तुकाराम मुंढे यांनी केली. cm devendra fadnavis breaks tukaram mundhes shop owners action

मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या निर्णयाला स्थगिती देऊन तूर्तास गले धारकांवर कुठलीही कारवाई करू नये असे आदेश दिले. गाळेधारकांसाठी नवीन सुधारित नियमावली तयार करण्याचे काम नगरविकास विभागामार्फत सुरू असल्याने तूर्तास गाळेधारकांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, असे आदेश दिल्याची माहिती आ. हिरे यांनी दिली आहे. पालिकेच्या कारवाई विरोधात गाळेधारकांच्या व्यथा आ. सीमा हिरे यांनी मंगळवारी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या.

मुंढे यांनी महापालिकेतील थकबाकीदार ११०० गाळेधारकांना रेडिरेकनर दरानुसार भाडे थकबाकी वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

tukaram mundhe nmc commissioner

पालिकेची प्रशासकीय घडी बसविताना मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे सत्तारूढ भाजपच अडचणीत सापडली आहे. पहिल्याच महासभेत विकासकामांचे सर्व प्रस्ताव मागे घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्वपक्षाच्याच सत्तेला अडचणीत टाकण्यासाठी तुकाराम मुंढेंची नियुक्ती केली आहे का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.

मुळात या गाळेधारकांच्या भाडेआकारणीचा वाद गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. रेडिरेकनर दरानुसार भाडेआकारणीला गाळेधारकांचा विरोध आहे. मात्र, त्याउपरही महापालिकेने सन २०१५पासून पूर्वलक्षी प्रभावाने गाळेधारकांना थकबाकी वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

याविरोधात गाळेधारकांनी आ. सीमा हिरे यांच्याकडे फिर्याद मांडल्यानंतर आ. हिरे यांनी गाळेधारकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे यासंदर्भात दाद मागितली होती. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला त्वरित निर्णय घेण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी दिले होते. या समितीने तत्काळ बैठक घेत गाळेधारकांना दिलासा देेण्याचे सूतोवाच केले होते.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत सुसह्य भाडे आकारणीचा निर्णयही झाला होता. मात्र, त्यानुसार दरनिश्चिती होण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली झाली. आयुक्तपदी मुंढे रुजू झाल्यावर पुन्हा एका रेडिरेकनर दरानुसार, तसेच विलंब शुल्कासह थकबाकी वसूल करण्याच्या नोटिसा गाळेधारकांना बजावण्यात आल्या आहेत.

cm devendra fadnavis breaks tukaram mundhes shop owners action

Get Latest Updates from Nashik even when you are seeking updates from friends : Like Our FB page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “तुकाराम मुंढेंच्या गाळेधारकांवरील कारवाईला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.