पोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी

पोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी जमावबंदी आदेश

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  पोलिस उप आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी  6 मार्च 2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र  व जमावबंदी आदेश जारी केला आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील.

पोलिस आयुक्तालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

नाशिक शहरात सामजिक, राजकीय व कामगार संघटनांची मोर्चे, निदर्शने, बंद, विविध आंदोलने,  धार्मिक सण, समारंभ, मोहिमा, निवडणूकांचे मतदान व मतमोजणी लक्षात घेता शहर पोलिस उप आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी  6 मार्च 2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 36 अन्वये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लेखी  व तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी  रस्त्यावरील जाणाऱ्या मिरवणुकीतील व्यक्तिंचे वागणे, बिभत्स व अश्लिल हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्यामार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर – सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजवणे किंवा कर्कश्श आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणेसाठी हे अधिकार प्रदान करण्यात आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील.

नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

नाशिक जिल्हा ग्रामीण क्षेत्रात ( पोलीस आयुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून ) कायदा व सुव्यवस्थेची स्थिती राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी  यांनी  6 मार्च 2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत   मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र  व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

पोलिसांना कायदा सुरक्षा व्यवस्था हाताळण्यास मदत व्हावी, यासाठी या कालावधीत शस्त्रे, तलवारी, बंदुका, सुरे व शारीरीक दुखापत करतील अशा  प्राण घातक वस्तु बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणेस, दाहक किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विनापरवानगी सार्वजनिकरित्या समाजाज तेढ अगर क्लेष निर्माण करतील अशा घोषणा करणे, गाणी, वाद्ये वाजवण्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.