ग्रीन झोन मधील शेत जमिनींना फक्त “शेती” असल्यास  कोणताही कर नाही

Share this with your friends and family

नाशिक : शहरातील जेथे शेत जमिनींवर शेती होते त्यावर  लाखो रुपये कर आकाराला जाणार अशी बातमी पसरली त्यामुळे शेतकरी आणि नागरिक चांगलेच भडकले होते. मात्र असा कोणताही कर ग्रीन झोन मधील शेत जमिनींवर शेती होत असेल तर लागणार नाही असे स्पष्टीकरण स्वतः मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.city developmental authorities no tax green zone only farming

मनपा उत्पन्न वाढीसाठी मनपा आयुक्त मोठे निर्णय घेत आहेत. यामध्ये अनेक वर्षापासून कर वाढ न झाल्याने मनपाचे उत्पन्न वाढ झाली नाही हे आयुक्तांच्या लक्षात आले होते. त्यावर निर्णय घेत अनके कर वाढविले गेले आहेत. याच करवाढीत  नाशिक मनपा हद्दीतील शेतीवरही वर्षाकाठी कर भरावा लागणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे शहर मनपा हद्दीतील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनपा हद्दीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र शेत जमिनी जेथे आहेत तेथे शेती न करता इतर व्यवसाय ज्यांनी थाटले आहेत त्यांना मात्र मालमत्ता कर भरावाच लागणार आहे असे आयुक्त मुंढे  यांनी स्पष्ट केले आहे.  ग्रीन झोन हरित पट्ट्यातील जमिनीवर बिनदिक्कत उभालेल्या मालमत्ता, बिल्डींग किंवा इतर व्यवसाय सुरु असतील तर त्यावर मालमत्ता कर लावला जाणार आहे.

नाशिक मध्ये अनेक ठिकाणी या शेतीच्या नावाखाली लग्नाचे हॉल , मिसळ दुकाने, हॉटेल आणि इतर बांधकामे करत ढाबे सुरु आहेत. त्यामुळे आता यांना लाखो रुपये कर भरावा लागणार असून लवकरच त्याची वसुली महापालिका करणार आहे.

city developmental authorities no tax green zone only farming

There are multiple zones prescribed by the developmental authorities for better planning of cities. Here is a list of the zones and what do they signify:

  • Yellow Zone- There are mainly 2 shades of Yellow, the dark yellow color denotes mixed residential use properties and lighter shade signifies mixed residential use lands. The land that falls in the darker yellow shade can be permitted for shops for essentials, like grocery, medicines, eateries, hotels, malls, Residential (however 33% commercial is permissible as per the by laws) etc.
  • Green Zone- A zone purely dedicated to the agricultural use or land that is protected to maintain greenery in the city. It has 4 shades that are reserved for forest,Agriculture, valley, lake, pond, garden, cemetery, graveyards, etc.
  • Red Zone- A zone that is meant for public and semi-public use like temple, medical college, institutions, hospital, etc.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.