मोकाट गायींचा महिलेवर शिंगावर उचलून हल्ला , महिला गंभीर जखमी

नाशिक : मोकाट कुत्रे यांची समस्या तर शहरात आहेच, त्यात मोकाट गायींची भर पडली आहे. सिडको परिसरात सकाळच्या वेळी एका महिलेवर पाच ते सहा गायींनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यात गायींनी महिलेला शिंगावर उचलून आपटले, तर पायाखाली  तुडवले, बचावासाठी काही युवक आल्याने या महिला बचावल्या मात्र त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे.

नवीन नाशिकमधल्या पाटील गार्डन जवळ निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा प्रकार घडला आहे. बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवर समोरून आलेल्या पाच-सहा गायींनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या. जोशी यांच्यावर गायींनी हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल केल आहे.

प्रत्यक्षदर्शी राहुल विंचूरकर यांनी सागितले की, याच परीसारतील गोठा मालकाच्या या गायी आहेत. या आगोदर सुद्धा त्यांचा त्रास झाला आहे. आज सकाळी जेव्हा राहुल घरातील खिडकीत बसले होते, तेव्हा पाच सहा गायी त्यांना महिलेच्या पाठीमागे पळताना दिसल्या होत्या, यातील काही गायींनी महिलेला शिंगावर उचलून जमिनीवर आपटले तर इतर गायींनी या महिलेला पाया खाली तुडवले होते. राहुल यांनी मदतीसाठी नागरिक आणि इतर मुलाना आवाज दिले, तेव्हा काही तरुणांनी या महिलेला वाचवले, मात्र या महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या, त्यामुळे काही मुलांनी त्यांचे सदरे फाडत त्यांचे वाहते रक्त थांबले, स्थानिक नगरसेवकाला कळवत महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. सुधीर पाऊल, प्रवीण खरात,अजय खरात, कल्पेश सोनवणे, राहुल विंचूरकर या तरुणांनी महिलेचे प्राण वाचवले आहे.

सिडको परिसरात कुत्रे आणि मोकाट सोडलेल्या गायींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेला अनेक तक्रारी करूनही कोणताही फायदा होतांना दिसत नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.