#Choice #Fancy #Number दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नविन मालिका

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. आकर्षक क्रमांक मिळण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज 19 जुलैपासून सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 दरम्यान कार्यालयाच्या आवक- जावक विभागात कक्ष क्रमांक 101 मध्ये जमा करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची व अर्जदाराच्या फोटो ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. नविन मालिका सुरू होण्याच्या दिवशी फक्त दुचाकी वाहन संवर्गातील वाहनधारकांचेच आकर्षक क्रमांकासाठीचे अर्ज स्विकारण्यात येतील. दुसऱ्या दिवसापासून इतर संवर्गाच्या वाहनधारकांना अर्ज सादर करता येतील. त्यासाठी तिप्पट शुल्क भरणे अनिवार्य राहील. पसंतीच्या क्रमांकासाठी विहीत शुल्क  रकमेचा राष्ट्रीयकृत अथवा शेड्यूल्ड बँकेचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे धनाकर्ष  व  पॅनकार्डची साक्षांकीत प्रत सादर करणे  आवश्यक आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलुन किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त एकच रकमेचा धनाकर्ष बंद पाकिटात सादर करावेत. जो अर्जदार विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. विहित शुल्काबाबतची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे, असे सहाय्यक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.