भुजबळांचे काम रुग्णालयातून सुरु : येवल्याच्या पाणी प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने टँकर उपलब्ध करून देण्याची भुजबळांची मागणी

नाशिक :- येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याआहे. टँकर्सची संख्या कधी नव्हे इतकी वाढवावी लागली आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. त्यामुळे तहानलेल्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध  करून देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना पाठविले आहे. Chhagan Bhujbal writes letter yeola drinking water issue nashik collector

छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाभरात येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची स्थिती असून दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण होत आहे. हा भाग मुळातच अवर्षण प्रवण आहे. अशा परिस्थितीमध्ये गावांकडून टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने पाहणी करुन टँकरला मंजूरी देण्यास प्राथमिकता देणे आवश्यक असते. मात्र अनेक दिवस टँकर्सचे प्रस्ताव प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Chhagan Bhujbal writes letter yeola drinking water issue nashik collector

NashikOnWeb.com ने दिलेली बातमी अशी : येवला : सायगाव महादेव वाडी आदिवासी वस्तीत पाण्याचा गंभीर प्रश्न

 

गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे का? जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का? इत्यादी निकषांचा किस काढून काही गावांचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवले जात आहेत. खरं तर टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताना देण्याऐवजी वेळ घालवला जात असल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. Chhagan Bhujbal writes letter yeola drinking water issue nashik collector

त्यांनी म्हटले आहे की, सध्या येवला तालुक्यातील संभाजीनगर-सावरगांव, बदापूर, आडगांव रेपाळ, पन्हाळसाठे व रहाडी या पाच गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रलंबीत आहेत. तर कोळम खु, कोळम बु., डोंगरगांव, खिर्डीसाठे-हनुमाननगर, पिंपळखुटे खु. अंतर्गत अहिरेवस्ती आणि कदमवस्ती अशा ५ गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबीत आहे. तर नगरसुल ग्रामपंचायतीने एकोणवीस  वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकर सुरु करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक दिवसांपासून मंजूरी दिलेली नाही.

गणेशपूर, आडसुरेगांव, गारखेडे व देवठाण या चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र ही गांवे आजही पाण्याच्या टँकरच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्यासाठी मंजूर असलेली १६ पैकी ५ टँकर अजुनही येवल्यात पोहोचलेले नाहीत. भीषण टंचाई परिस्थिती असतांनाही ११ गावांचे प्रस्ताव अनेक दिवस विविध स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबीत आहेत  ही अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Chhagan Bhujbal writes letter yeola drinking water issue nashik collector

टंचाईग्रस्त गावांतील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेले आहेत.  शासकीय अधिकारी टंचाईकडे दुर्लक्ष करत आहेत अशी भावना नागरीकांमध्ये निर्माण झालेली आहे. तरी, तेथील भीषण परिस्थितीचा विचार करुन टंचाईग्रस्त गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे आणि या गावांमध्ये टँकर पोहचले की नाही, याचा आढावा घेऊन दुष्काळी भागातील नागरीकांना दिलासा द्यावा असे भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

येवल्याच्या प्राणी प्रांशी NashikOnWeb.com वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या इथे क्लिक करून वाचा… येवल्याचा प्राणी प्रश्न

Chhagan Bhujbal writes letter yeola drinking water issue nashik collector

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.