पंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ ?

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे  विजयी झाले आहेत. दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळविला आहे.दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. बेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली आहेत.पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता न आल्याने इलिमिनेशन राउण्ड घेण्यात आला. प्रथम तळाच्या तीन उमेदवारांना मिळालेली दुसºया पसंतीची मते मोजण्यात आली. ही प्रक्रीया १५ व्या फेरीपर्यंत चालली आहे. chhagan bhujbal supports shivsena candidate kishor darade mlc election

ही निवडणूक पाहता आणि स्थानिक स्वराज्य संस्था आमदार नरेंद्र दराडे यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय खुले पणाने छगन भुजबळ यांना दिले होते. त्यामुळे आता त्यांचे बंधू सुद्धा मोठ्या फरकाने विजयी झाले , त्यात भुजबळ यांचे बळ होते का ? अशी जोरदार चर्चा आहे.भुजबळ बाहेर आले आणि नाशिकचे राजकारण पुन्हा बदलून गेले आहे. संख्या बदल करत भुजबळ नवीन राजकीय खेळी करत आहेत का या विषयानुरूप सुद्धा चर्चा करण्यात येत आहे.नाशिकमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे हे आधी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ते छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.छगन भुजबळ आणि शिवसेनेत याही निवडणुकीच्या आधी फोनवरून चर्चा झाली होती आणि पुन्हा या निवडणुकीत चमत्कार दिसला.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमाेजणी गुरूवारी झाली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे उमेदवार कपिल पाटील विजयी झाले. त्यांनी हा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा राखला. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपच्या अमित मेहता यांच्यावर विजय मिळवत मुंबईची जागा कायम राखली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे.

 • पहिल्या २० हजार मतपत्रिकेत किशोर दराडे यांना सात हजार ९२४ मते
 • बेडसे यांना ३ हजार ४२७ मते
 • भाऊसाहेब कचरे यांना दोन हजार ८७८
 • अनिकेत पाटील यांना एक हजार ९४६ मते
 • २० हजार मतपत्रिकेचे तपासणीत दराडे यांना एकूण १३ हजार ९५७
 • बेडसे यांना आठ हजार २३२ अनिकेत पाटील यांना चार हजार ७९२
 • कचरे यांना चार हजार ७५३ मते
 • एकूण ४० हजार मतांच्या तपासणीत ३८ हजार ५८४ मते वैद्य
 • एक हजार ३४१ मते बाद
 • ७२ मतदारांनी नोटाचा वापर केला
 • कूण ४७ हजार ९७८ मते वैद्य ठरल्याने २३ हजार ९९० मतांचा कोटा निश्चित  केला
 • प्रथम पसंतीच्या मतांमध्ये किशोर दराडे यांना १६ हजार ८८६ मते
 •  बेडसे यांना दहा हजार ९७०, अनिकेत पाटील यांना सहा हजार ३२९,
 • शाळीग्राम भिरुड यांना तीन हजार ८७६  भाऊसाहेब कचरे यांना पाच हजार १६७
 • प्रताप सोनवणे यांना ५०७ मते मिळाली आहेत.
 • कमी मते मिळालेल्या उमेदवारांना इलिमेट करून त्यांच्या मतपत्रिकेवर दुसºया क्रमांकाची मिळालेली मते अन्य उमेदवारांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
 • राडे यांची २६ मते, तर बेडसे यांची सहा मते वाढली
 • दराडे यांना १६ हजार ९१२
 • बेडसे यांना १० हजार ९७६ मते मिळाली

आजच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :-

कडवा कालवा विभागाचे कार्यालय धुळे येथे स्थलांतरीत निर्णय तात्काळ रद्द करा -छगन भुजबळ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आरोग्य बॅंक योजनेस मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

डिझेल दरवाढ आणि इतर प्रश्नांवर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे तीव्र चक्काजाम आंदोलन

पंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ ?

उमेदवार व त्यांना मिळालेली मते सर्व फेऱ्या फोटो सहाय्य निवडणूक आयोग

chhagan bhujbal supports shivsena candidate kishor darade mlc election

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.