essential commodities जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

essential commoditiesकोरोनाच्या प्रादूर्भावामुळे नेहमीच्या कामकाजावर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे लोक घरी बसले आहेत. लोकांचे अन्न धान्यावाचून हाल होवू नये त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान केल्याची माहिती, अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  

भुजबळ म्हणाले, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व प्राप्त लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल याची काटेकोरपणे काळजी घ्यावी. तसेच दुकानात काळाबाजार व साठेबाजी होणार नाही याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटपाचे काम सुरू असून, हळूहळू संपूर्ण राज्यात मोफत तांदूळ वाटपाचे काम करण्यात येणार आहे. 
राज्यातील पुरवठ्याची वाहतूक यंत्रणा सुरळीत व्हावी यासाठी वारंवार गृह विभागाचे मंत्री तसेच अधिकारी यांच्या संपर्कात असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. पुरवठा विभाग, महसूल व पोलीस विभागाने समन्वय साधून काम करावे. आपण लोकांची सेवा करण्यासाठी घराच्या बाहेर आहोत राज्यात कुठेही अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही व सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे आवाहनही त्यांनी केले.essential commodities

सोशल डिस्टन्स व लॉकडाऊनमुळे आपण इतर कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु रेशनिंग, पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह, पोलिस, आरोग्य विभागाची यंत्रणा, औषधे, किराणा,  भाजीपालाचे दुकानदार, शेतकरी, महावितरण ही सर्व यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत असून, या सर्वांचे काम प्रशंसनीय असल्याचे भुजबळ यांनी  सांगितले.essential commodities

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.