भुजबळांचा वाढदिवस अन् दिवाळी तुरुंगातच होणार साजरी

जामीन अर्जवरची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

छगन भुजबळ यांना तुरुंगातून बाहेर येण्यास अजून अवधी लागणार असून आज ( दि. १२) त्यांच्या जामिनीच्या अर्जावर झालेल्या सुनावणीचा निकाल पुढील १५ दिवसासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळांचा १५ ऑक्टोबरला असलेला वाढदिवस तुरुंगातच साजरा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या साहेबांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

आज सुनावणी वेळी नाशिकहून आमदार जयंत जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत गेले होते. साहेबांना आज जामीन मिळून आज त्यांची सुटका होणार अशी अपेक्षा सर्वांना होती. सुनावणी वेळी न्यायालयात आलेल्या भुजबळांची आमदार जाधवांनी भेट घेतली, त्यांना त्याच वेळी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दीपावली साठी तुरुंगातून बाहेर यावे अशी अपेक्षा त्यांनी बाळगत भेट आटोपटी घेतली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मनी लॉनडरिंगसह विविध आरोपांत प्रकरणात अडकल्याने तुरुंगाची हवा खात आहेत. अनेकवेळा भुजबळांचा जामीन फेटाळला गेला असून यावेळी मात्र जामीन अर्जावर निर्णय लांबवणीवर टाकला गेल्याने भुजबळांना जामीन मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

दरम्यान नाशिक शहरात समता परिषद आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार केला आहे. शहरभर भुजबळ आणि समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देणारे फलक लावले आहेत. तर समता परिषदेने अवयवदानाचा कार्यक्रम आखला आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.