छगन भुजबळ यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमांनी उत्साह; स्थानिक नेते फार्मवर

नाशिक :- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस आज (दि.१५ ऑक्टोबर) भुजबळ फार्म येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त जिल्हाभर करिअर मार्गदर्शन शिबीरे, तज्ञ डॉक्टरांकडून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीरे, गणवेश वाटप, क्रीडा,वादविवाद तसेच निबंध स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, सर्व रोग निदान शिबीर, वृक्षारोपण, रुग्णालयात फळे वाटप यांसह विविध भरगच्च समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. chhagan bhujbal birthday 15th October Nashik

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, जेडीयु अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. सुप्रिया सुळे,  खा. प्रफुल पटेल, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, मधुकरराव पिचड, गणेश नाईक, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार बळीराम शिरसकर, भारीप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे, इत्यादी मान्यवरांनी भुजबळ यांना दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. chhagan bhujbal birthday 15th October Nashik

यावेळी नाशिकचे महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सर्वश्री अनिल कदम, बाळासाहेब सानप, पांडुरंग वरोरा, निर्मला गावित, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.सुधीर तांबे, उपमहापौर प्रथमेश गीते, विनायकदादा पाटील, माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे, डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे, तुकाराम दिघोळे, माजी आमदार दिलीप बनकर,संजय चव्हाण,अनिल आहेर, वसंत गिते, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, राजस्थानचे समता परिषदचे प्रदेशाध्यक्ष मोतीलाल साखला,मध्यप्रदेश समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह,उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमलाल मोरया, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापू भुजबळ, डॉ तुषार शेवाळे, माजी महापौर विनायक पांडे, सुनील बागुल, दत्ताजी गायकवाड, डॉ. कैलास कमोद, दिंडोरी लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, नाशिक लोकसभेचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद आहेर,जयवंतराव जाधव, गजानन शेलार, संदीप गुळवे, डॉ. भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, मधुकरराव जेजुरकर. अॅड. भगीरथ शिंदे, शाहू खैरे, हेमलता पाटील, निवृत्ती अरिंगळे, गोकुळ पिंगळे, गोरख बलकवडे, शिवाजी गांगुर्डे, सभापती यतींद्र पगार, सभापती अर्पणा खोसकर, सभापती रत्नाकर चुंभळे, हिरामण खोसकर यांनी तसेच जिल्हापरिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विजयश्री चुंभळे, पालघरचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, लातूरचे समता परिषद अध्यक्ष तान्हाजीराव फुले, विदर्भ दिवाकर गमे, परभणीचे अध्यक्ष चक्रधर उगले, बीडचे अॅड. सुभाष राऊत, बुलढाणाचे संतोष खांडेभराड, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे, माजी खासदार माधवराव पाटील, समता परिषद कोकण विभाग प्रमुख डॉ. राजू जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नाना महाले, शरद कोशिरे, बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, संतोष डोमे, हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, परवेझ कोकणी, अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, महेश भामरे आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक याच्यासह विविध मान्यवरांनी भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या.

chhagan bhujbal birthday 15th October Nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.