छबू नागरेची जामिनावर सुटका

नाशिक : नोटाबंदीच्या काळात बनावट नोटा छपाई प्रकरणात अटक करण्यात आलेल्या छबू नागरेला आज (दि. ३) जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केल्याने त्याची सुटका होणार आहे. मुख्य न्यायाधीश अरुण ढवळे यांनी काही अटी व शर्थी ठेवत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणी आता केवळ एक संशयित कारागृहात असून अन्य सर्व संशयित जामीन मिळून बाहेर आहेत. छबू नागरे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे.

बनावट नोटांच्या खळबळजनक ठरणाऱ्या या प्रकरणी २३ डिसेंबर २०१६ रोजी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह नागरे व त्याच्या अकरा साथीदारांना आडगाव पोलिसांनी अटक केली होती.

जामीन मंजूर करताना ठेण्यात आलेल्या अटी :

  • रहिवासाचा कायमस्वरुपी पत्ता देणे
  • जामिनावर असताना माफीच्या साक्षीदारासह अन्य साक्षीदारांना संपर्क न करणे
  • आडगाव पोलीस ठाण्याच्या परवानगीनंतरच राज्याबाहेर जाणे
  • तसेच न्यायालयाच्या परवानगीनंतरच परदेशात जाण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.