बुद्धिबळ स्पर्धा : खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद, स्विस पद्धतीचा अवलंब

नाशिक : जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत लहान मुलांसाठी विविध गटनिहाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. Chess Tournament Swiss System Botvinnik School Nashik District Association,

या स्पर्धेसाठी सात हजाराची रोख बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील वयोगटांत खेळवली गेली.

अतिशय चुरशीच्या स्पर्धेत अनेक मानांकित खेळाडूंना पराभवाचे धक्के सहन करावे लागले. या स्पर्धा बॉटविनीक चेस स्कूल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. Chess Tournament Swiss System Botvinnik School Nashik District Association

आंतरराष्ट्रीय स्विस पद्धतीचा अवलंब करीत फिडे नियमानुसार स्पर्धेच्या सर्व फेऱ्या खेळविल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलित हॉल मध्ये व सुयोग्य वातावरणात स्पर्धा पार पडल्याने पालकांनी जिल्हा संघटनेचे विशेष आभार मानले.

या स्पर्धेचे उदघाटन उद्योजक रमेश गोठी यांच्या हस्ते करण्यात आले तर विजेत्या स्पर्धकांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, उपाध्यक्ष डॉ. सोनावणे, सचिव सुनील शर्मा, कोषाध्यक्ष जयेश भंडारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Chess Tournament Swiss System Botvinnik School Nashik District Association

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे…

१) १० वर्षांखालील गट :-प्रथम शर्वरी सांगळे , व्दितीय राम राठी

२) १२ वर्षांखालील गट :-प्रथम वृंदा राठी  , व्दितीय सोहम खरोले

३) १४ वर्षांखालील गट :-प्रथम शंतनू सांगळे   , व्दितीय देवांग मौर्य व कौशिक सालसींगीकर

४) १६ वर्षांखालील गट :-प्रथम वरुण वाघ , व्दितीय हर्ष डोडल

Chess Tournament Swiss System Botvinnik School Nashik District Association
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.