चांदवडला एकवार बिबट्याचा हल्ला

 चांदवड तालुक्यामधील हट्टी गावात पहाटेच्या सुमारास बिबट्याने व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गावकरी  नंदू बहाद्दूर परदेशी  हे जखमी झाले आहेत. परदेशी हे  पहाटेच्या सुमारास प्रातविधीसाठी मोकळ्या भुखंडाच्या दिशेने निघाले होते, तेव्हा लपलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर  हल्ला केला आहे. मात्र त्याचा हल्ला चुकला आणि परदेशी यांच्या  पायाला बिबट्याचे  जोरदार नखांचे  ओरखेडे लागले आहेत.

तेव्हा परदेसी यांनी हातात ज्वा घेवून पळ काढला आहे त्यामुळे ते वाचले आहेत. नाशिक शहरा सह  निफाड, दिंडोरी, चांदवड या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याचा  दिसून आला आहे. तर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका बालकाने आपला जीव सुद्धा गमावला आहे. या सर्व  घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर वन विभाग काय काम करते असा प्रश्न उभा राहिला आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.