नाशिकमध्ये आत्महत्यांचे सत्र, दोघांनी घेतला गळफास

नाशिक : नाशिक शहरात आज आत्महत्यांच्या दोन घटना घडल्या आहेत. यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आपापले जीवन संपवले आहे. ceaseless suicide attempts nashik news

पहिल्या घटनेमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने मेकॅनिकल डिप्लोमाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केली. संतोष नागोरी (वय१९) असे तरुणाचे नाव आहे. तो व्दितीय वर्षात नापास झाला होता.

दुसऱ्या घटनेत अल्वायीन तरुणीने आत्महत्या केली आहे. टाकळी रोडवरील जुना कथडा भागात ती रहिवासी होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्रद्धा गोरख चहाळे (वय 17रा. घर नंबर 3780कोळी वाडाजुना कथडाटाकळी रोडनाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. काही तरी अज्ञात कारणातून घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्याने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

ceaseless suicide attempts nashik news

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *