cbs nashik : लॉजमध्ये तरुणीचा आढळला मृतदेह, प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिमध्ये एका हॉटेलमध्ये ठाण्यातील बोईसर येथे राहणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. सीबीएसवरील एका हॉटेलच्या लॉजिंगमधील खोलीत बुधवारी (दि.१३) संध्याकाळी एका २१वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. यावेळी त्या युवतीसोबत मुक्कामी वास्तव्यास असलेल्या संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवतीचा तोंड दाबून खुन केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे.cbs nashik

नाशिकमध्ये गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिमध्ये एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधली ही घटना आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Suspicious death of a young woman who went to lodge with a friend Nashik news)cbs nashik

मृत तरुणी ही काल आपल्या मित्रासोबत लॉजवर

अधिक माहितीनुसार, मृत तरुणी ही काल आपल्या मित्रासोबत लॉजवर आली होती. त्यानंतर आज सकाळी तरुणीचा खोलीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीस तपसा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकणातील मृत तरुणी ही नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून मुलीच्या मित्रालाही ताब्यात घेतलं आहे.

 

नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधली ही घटना

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (२१,रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) आणि अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) हे युगल मुक्कामी आले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने खोली दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई,वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे येऊन धडकले. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक-२०३च्या दिशेने धाव घेतली.

 

पलंगावर अर्चना मृतावस्थेत

यावेळी खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेतआढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता. याबाबत व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

पोलीस सध्या तरुणाची चौकशी करत असून त्याच्याकडून नेमकं काय झालं याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. cbs nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.